चाटोरी येथे लसीकरण मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 09:58 PM2021-04-28T21:58:19+5:302021-04-29T00:40:42+5:30

चांदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेल्या चाटोरी, सायखेडा येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

Vaccination campaign started at Chatori | चाटोरी येथे लसीकरण मोहीम सुरू

चाटोरी येथे लसीकरण मोहीम सुरू

Next
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यापासून चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू

चांदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेल्या चाटोरी, सायखेडा येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

पहिल्या टप्प्यापासून चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते. मात्र, गोदाकाठ भागातील २० ते ३० गावातील नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रापर्यंत पोहोचणे अवघड बनले होते. अनेक नागरिकांना लसअभावी परत माघारी परतावे लागायचे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे व वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य विभागाकडे लस पुरवठा वाढवून मागितला व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र असलेले चाटोरी, सायखेडा येथे लसीकरण सुरू करण्यात आले. या दोन उपकेंद्रांअंतर्गत शेकडो नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होत असल्याने चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चितेगाव सह सर्वच उपकेंद्रामध्ये लसीकरण सुरू करण्याची व लसीचे डोस वाढवण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी केली आहे.

Web Title: Vaccination campaign started at Chatori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.