ठळक मुद्दे पावसाळ्यात होणाऱ्या काळ्या ब खरकुती रोंगावर प्रतिबंधक म्हणून लस दिली जाते.
नांदगाव : तालुक्यात पाळीव प्राण्यांना व जनावरांना लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.तालुक्यात ८६ हजार गायी व म्हसी आदी पाळीव प्राणी आहेत. या प्राण्यांना पावसाळ्यात होणाऱ्या काळ्या ब खरकुती रोंगावर प्रतिबंधक म्हणून लस दिली जाते. या लसीचा लाभ प्राणिमित्रांनी व पाळून जनावरांच्या मालकांनी घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पशुधनातून अधिकारी डॉ. चव्हाण, डॉ. एन. डी. ताठे यांनी केले आहे. याकरिता अण्णा पवार, नानासाहेब काकळीज परिश्रम घेत आहे .