नांदूरशिंगोटे : येथील उपकेंद्रात ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, रामदास सानप, भारत दराडे, उत्तम बर्के, अनिल शेळके, अनिल पठारे, नानासाहेब शेळके, समुदाय आरोग्य अधिकारी प्रणाली दिघे, आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण सुरू करण्यात आले. सिन्नर, दोडी, दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच ज्येष्ठ व महिलांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने उपकेंद्र स्तरावर लसीकरण सुरू करण्याची मागणी केली होती. सोमवारी झालेल्या लसीकरणात २०० जणांना लस टोचण्यात आली. ४५ वर्षांवरील व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
नांदूरशिंगोटेत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:13 AM