नाशिक जिल्ह्यात लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:52 PM2021-04-01T23:52:35+5:302021-04-02T01:10:11+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची लस गुरुवारी (दि. १ मार्च) केवळ ग्रामीण भागातील काही केंद्रांवर उपलब्ध होती. तर शहरातील बहुतांश केंद्रांवर सकाळीच लस संपुष्टात आल्याचे फलक लागले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्ह्याला १ लाख ९० हजार इतका आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा लससाठा प्राप्त झाला आहे.

शहरातील बहुतांश तर जिल्ह्यातील काही केंद्रांवर लस संपल्याचे प्रकार गुरुवारी घडले. ग्रामीण भागातील काही केंद्रांवर शे-दीडशे लस दिल्यानंतर साठा संपुष्टात आल्याने काही ठिकाणी नागरिकांना परत जावे लागले. दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्ह्याला १ लाख ९० हजार असा आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा लससाठा प्राप्त झाल्यानंतर त्याचे जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रांवर वितरण करण्यात आले. महानगरातील बहुतांश केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लस घेण्यास आलेल्या अनेक नागरिकांना लस न घेताच परतावे लागले. जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज सुमारे १२ हजारांवर नागरिकांचे लसीकरण सुरू होते. मात्र, आता पुरेशा प्रमाणात स्टॉक उपलब्ध झाल्याने किमान पुढील आठवड्याहून अधिक कालावधीसाठी २० हजार लसीकरण करणे शक्य होणार आहे.