नाशिक पश्चिम प्रभाग सभापतिपदी मनसेच्या वैशाली भोसले बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:20 AM2018-04-22T00:20:43+5:302018-04-22T00:20:43+5:30
महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी मनसेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची संधी मिळाली आहे. भाजपाने मागील वर्षीच प्रभाग सभापतिपदासाठी मनसेला पाठिंबा दर्शविल्याने सदर निवड बिनविरोध झाली.
नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदी मनसेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची संधी मिळाली आहे. भाजपाने मागील वर्षीच प्रभाग सभापतिपदासाठी मनसेला पाठिंबा दर्शविल्याने सदर निवड बिनविरोध झाली. पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक ७, १२ आणि १३ हे तीन प्रभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. पश्चिम विभागात भाजपा-५, शिवसेना-१, कॉँग्रेस-४, राष्टÑवादी-१ आणि मनसे-१ असे पक्षीय बलाबल होते. मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होऊन मनसेने पुन्हा आपली जागा राखली. या पोटनिवडणुकीत अॅड. वैशाली मनोज भोसले निवडून आल्या. दोन आठवड्यांपूर्वीच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करणाऱ्या वैशाली भोसले यांना राजकीय पदार्पणातच सभापतिपदाची उमेदवारी देण्यात आली. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाने मनसेला पाठिंबा दर्शविला होता. त्यानुसार, सातपूर प्रभाग समितीवर भाजपाला कब्जा करता आला होता मात्र, पश्चिम प्रभाग समितीत सुरेखा भोसले या आजारपणामुळे उपस्थित राहू न शकल्याने कॉँगे्रेसच्या हेमलता पाटील यांनी भाजपाच्या प्रियंका घाटे यांना पराभूत केले होते. दरम्यान, यावर्षी सातपूर प्रभाग समितीवर मनसेचा सभापती निवडून आल्यानंतर पश्चिम प्रभागसाठी मनसेच्याच उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यानुसार, मनसेच्या वैशाली भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. शनिवारी (दि.२१) सकाळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी वैशाली भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी, शाहू खैरे, गजानन शेलार, हिमगौरी अहेर, समीर कांबळे सदस्य उपस्थित होते, तर शिवसेनेचे अजय बोरस्ते आणि भाजपाच्या स्वाती भामरे व प्रियंका घाटे गैरहजर राहिल्या. सभापतिपदी निवड झाल्यानंतर वैशाली भोसले यांचा महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार नितीन भोसले उपस्थित होते.