सायगाव : कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रेरणा देण्यासाठी जिल्हा परिषद परिषदेकडून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धा सायगाव केंद्र शाळेत उत्साहाने संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख म.का. चव्हाण व मुख्याध्यापक चांगदेव कुळधर यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेमध्ये वक्तृत्व, चित्रकला, २०० मीटर धावणे मुले, १०० मीटर धावणे मुली, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गीतगायन, समूह नृत्य, समूह गीतगायन, कबड्डी, खो खो, मुले-मुली इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धांमध्ये केंद्रातील १४ शाळांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये विजेते पुढील प्रमाणे वक्तृत्व प्रथम क्र मांक लहान गट अनुष्का दारुंटे (सायगाव), मोठा गट प्रतीक्षा चिंचवणे, (आंगुलगाव), चित्रकला लहान गट समीर भालेराव, (सायगाव), मोठा गट कोमल देवरे (न्याहारखेडे), २०० मीटर धावणे, लहान गट शुभम मोरे (न्याहारखेडे), मोठा गट ४०० मीटर धावणे, मच्छिंद्र मोरे (रेंडाळे), १०० मीटर धावणे प्रथम राणी आहेर (रेंडाळे), मोठा गट २०० मीटर धावणे शुभांगी गुंजाळ. सर्व विजेत्या स्पर्धकांना केंद्रप्रमुख मधुकर चव्हाण, मुख्याध्यापक दत्ता पवार, अरुण पवार, पंडोरे सर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच स्पर्धांचे परीक्षक म्हणून अशोक रेड्डी, स्मिता पाटील, अमित कलगुंडे, संतोष बेलदार, किशोरी नाकोड, ज्योती जाधव, श्रद्धा बिरारी, सुनंदा बोरसे, गजानन देवकत्ते, विजय परदेशी यांनी कामकाज केले. सूत्रसंचालन रवींद्र शेळके यांनी केले. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी अशोक रेड्डी, विजय परदेशी, दत्ता पवार, विश्वास जोंधळे, सुनीता ताराळकर, गजानन देवकत्ते, यांनी परिश्रम घेतले आभार विजय परदेशी यांनी मानले.
कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव सायगाव केंद्र शाळेत विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:49 PM
कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रेरणा देण्यासाठी जिल्हा परिषद परिषदेकडून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धा सायगाव केंद्र शाळेत उत्साहाने संपन्न झाल्या.
ठळक मुद्देवैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गीतगायन, समूह नृत्यकेंद्रातील १४ शाळांनी सहभाग घेतला