मुलीच्या पंचक्रिया विधीतच जावयावर वस्तऱ्याने हल्ला
By admin | Published: July 5, 2017 11:40 PM2017-07-05T23:40:37+5:302017-07-05T23:40:56+5:30
२५ लाखांची मागणी : गुन्हा दाखल; माहेरच्या आठजणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : मातृछत्र हरपलेल्या पाच दिवसांच्या नातीला पंचवीस लाख रुपये द्यावेत या मागणीतून लेकीच्या पंचाक्रिया विधीच्या कार्यक्र मातच माहेरवासीयांनी धुडगूस घालून सैन्यदलातील जावयावर वस्तऱ्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सटाणा शहरात घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी ब्राह्मणपाडा येथील आठ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मातृछत्र हरपलेल्या पाच दिवसांच्या चिमुरडीचा चांगल्या प्रकारे सांभाळ व्हावा म्हणून गेल्या चार दिवसांपासून मेघाचे वडील उत्तम वामन चव्हाण (रा. ब्राह्मणपाडा) यांनी नातीसाठी पंचवीस लाख रु पये द्यावेत म्हणून ठाकरे यांच्याकडे तगादा लावला होता. यावरून रक्षा विसर्जनाच्या दिवशीदेखील दोन्ही परिवारामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. दरम्यान, आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ठाकरे यांच्या घरासमोर पंचिक्र या विधीचा कार्यक्र म सुरू असताना वडील उत्तम चव्हाण यांच्यासह माहेरवासीयांनी पंचवीस लाख रु पयांची मागणी करून कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाब्दिक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत होऊन घरातील शोकेसची तोडफोड करून नितीनवर वस्तऱ्याने हल्ला करून जखमी केले. तसेच ठाकरे कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या हाणामारीमुळे पंचिक्र या विधीचा कार्यक्र म अक्षरश: उधळून लावला. हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक बशीर शेख, उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी ठाकरे यांनी सटाणा पोलिसांत तक्र ार दिल्यानंतर उत्तम वामन चव्हाण, बबन उत्तम चव्हाण, भालचंद्र रामभाऊ चव्हाण, गणेश शिवाजी चव्हाण , ताराचंद शिवाजी चव्हाण, संजय डोंगर चव्हाण, शिवाजी वामन चव्हाण, मधुकर भावराव चव्हाण (सर्व, रा. ब्राह्मणपाडा), कारभारी यादव भामरे, रवींद्र यादव भामरे, रामचंद्र महादू शेवाळे (तिघे, रा. आनंदपूर), कापडणीस यांच्यासह तेरा जणांविरु द्ध गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रसूतीदरम्यान झाला मृत्यूशहरातील कृष्णनगर भागात राहणाऱ्या सेवानिवृत्त एस.टी कर्मचारी रामदास भिका ठाकरे यांचा मुलगा नितीन (२८) अंबाला, हरियाणा येथे सैन्यदलात नोकरीला आहे. नितीनची पत्नी मेघा गेल्या ३० जून रोजी प्रसूतीसाठी एका खासगी रु ग्णालयात भरती झाली होती. पहाटे प्रसूती होऊन मेघाला कन्यारत्न झाले. मात्र दुर्दैवाने प्रसूतीदरम्यान प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मेघाचा मृत्यू झाला.