जनावरांसह वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 02:03 AM2020-04-28T02:03:24+5:302020-04-28T02:03:49+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे. याच आदेशाचे उल्लंघन करून रविवारी (दि. २६) रात्री पावणेअकराच्या सुमारास (एमएच १५ बीजे ४३१४) या पिकअप वाहनामध्ये सहा जनावरे निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी तातडीने कारवाई करत जनावरांसह वाहन जप्त केले आहे.
ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे. याच आदेशाचे उल्लंघन करून रविवारी (दि. २६) रात्री पावणेअकराच्या सुमारास (एमएच १५ बीजे ४३१४) या पिकअप वाहनामध्ये सहा जनावरे निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी तातडीने कारवाई करत जनावरांसह वाहन जप्त केले आहे.
येथून जवळच असलेल्या साकोरे मिग येथील अनिल चंद्रभान बोरस्ते व गावातील नागरिकांनी सदर गाडी अडवून चालकाकडे चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे याबाबत तातडीने ओझर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.
ओझर पोलिसांनी कारवाई करत सहा जनावरे ताब्यात घेत वाहन जप्त केले असून, गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नईम हारून कुरेशी, शाहरूख सलीम कुरेशी, अल्तमज सलीम कुरेशी व सलीम सुलेमान कुरेशी (सर्व रा. चांदणी चौक) तसेच मुन्ना बशीर सय्यद रा. साकोरे (मिग) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.