रस्त्यावर उभी राहणारी वाहने मनपाकडून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:44 PM2020-01-13T23:44:11+5:302020-01-14T01:29:07+5:30

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण करून थेट मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून रस्ता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पूर्व विभागाने सोमवारी धडक मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकवर लावलेल्या नऊ दुचाकी उचलून नेल्या.

Vehicles standing on the road are occupied by the Corporation | रस्त्यावर उभी राहणारी वाहने मनपाकडून ताब्यात

रस्त्यावर उभी राहणारी वाहने मनपाकडून ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसाईनाथनगर : जॉगिंग ट्रॅक बनला होता अनधिकृत वाहनतळ


साईनाथनगर : जॉगिंग ट्रॅक बनला होता अनधिकृत वाहनतळ

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण करून थेट मुख्य रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून रस्ता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पूर्व विभागाने सोमवारी धडक मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकवर लावलेल्या नऊ दुचाकी उचलून नेल्या.
नाशिक महापालिकेने साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर क्रमांक एकपर्यंत लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने साईनाथनगर, डीजीपीनगर क्रमांक एकसह परिसरातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सकाळ व संध्याकाळ मोठ्या प्रमाणात फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते. त्याची दखल घेत महापालिकेच्या पूर्व विभागाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवून जॉगिंग ट्रॅकमध्ये लावण्यात आलेल्या नऊ दुचाकी उचलून नेल्या. या वाहनांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहीम शिवाजी काळे, गुणवंत वाघ, अजित वजाळे, मुनीर शेख, जीवन ठाकरे आदी कर्मचाऱ्यांनी राबवली.

वारंवार तक्रारी
साईनाथनगर चौफुलीलगतच आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने त्याठिकाणी जिल्ह्याच्या विविध भागातून परीक्षेसाठी विद्यार्थी येतात. त्यातील बहुतेक विद्यार्थी सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकच्या मध्येच चारचाकी आणि दुचाकी वाहने लावतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत होता. या वाहनांचा फेरफटका मारण्यास येणाºयांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र अखेर यासंबंधी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Vehicles standing on the road are occupied by the Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.