निवृत्तीनाथ महाराजपालखी शुक्र वारी त्र्यंबकेश्वरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 06:55 PM2019-07-30T18:55:01+5:302019-07-30T18:56:32+5:30

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शुक्र वारी स्वगृही त्र्यंबकेश्वरला येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली निवृत्तिनाथ महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात असून, शुक्रवार, दि. २ आॅगस्ट रोजी त्र्यंबकेश्वरी दाखल होणार आहे.

Venkateswari Trimbakeshwar to Nivritinath Maharaj! | निवृत्तीनाथ महाराजपालखी शुक्र वारी त्र्यंबकेश्वरला!

निवृत्तीनाथ महाराजपालखी शुक्र वारी त्र्यंबकेश्वरला!

Next

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शुक्र वारी स्वगृही त्र्यंबकेश्वरला येत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली निवृत्तिनाथ महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात असून, शुक्रवार, दि. २ आॅगस्ट रोजी त्र्यंबकेश्वरी दाखल होणार आहे.
सालाबादप्रमाणे ज्येष्ठ वद्य १ मंगळवार, दि. १८ जून रोजी सकाळी ११ वाजता दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे रवाना झाली होती. या सोहळ्यात सुमारे १० हजार वारकरी सहभागी झाले होते.
काही सामाजिक संस्थेकडून पालखी मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या.
सोहळ्यात सहभागी झालेला प्रत्येक वारकरी विठूनामात तल्लीन होत झपाझपा वाट काढत होता. विठ्ठलभेटीच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहºयावर थकल्याचा भाव दिसत नव्हता. शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी विठ्ठलदर्शन घेतल्यानंतर निवृत्तिनाथ पालखी परतीच्या प्रवासाला सज्ज झाली. पालखी परतीच्या प्रवासात असून, मंगळवारी पालखीचा सिन्नरला मुक्काम झाला. शुक्रवारी पालखी त्र्यंबकेश्वरी दाखल होईल, अशी माहिती पालखीचे प्रमुख पुंडलिकराव थेटे यांनी दिली. दिंडी सोहळ्यात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पंडितराव कोल्हे, माजी अध्यक्ष तथा विश्वस्त संजयनाना धोंडगे, माजी अध्यक्ष तथा विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, जयंत गोसावी, मानकरी मनोहर बेलापूरकर, बाळकृष्ण डावरे कोनांबेकर तसेच मखमलाबाद भजनी मंडळ सहभागी झाले आहे.
४दिंडी सोहळ्यात यंदा नवा उपक्रम राबविण्यात आला. निर्मल वारी व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वारकऱ्यांनी निर्मल वारीतून हगणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच पालखी मार्गातील गावांना आपल्या हद्दीत किमाण पंचवीस रोपांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. टाळमृदंगाच्या गजरात मजल दरमजल करत पालखी पंढरपूरच्या दिशेने सरकत होती.

Web Title: Venkateswari Trimbakeshwar to Nivritinath Maharaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.