ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभिनव भारत ट्रस्टचे अध्यक्ष सुर्यकांत रहाळकर यांचे निधन
By संजय पाठक | Published: September 13, 2023 03:58 PM2023-09-13T15:58:58+5:302023-09-13T15:59:27+5:30
७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अल्पशा आजाराने मृत्यू
संजय पाठक, नाशिक : येथील नाशिक एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नाशकातील अभिनव भारत ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे हेाते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने रूग्णालयात उपचार घेत होते. मात्र, त्यांची आज दुपारी त्यांच प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परीवार आहे आज सायंकाळी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बीवायके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, पत्रकार, रहाळकर सोडा फॅक्टरीचे संचालक, बांधकाम व्यवसायिक अशा अनेक प्रकारे त्यांची ओळख हेाती. १९२३ मध्ये स्थापन झालेल्या नाशिक एज्युकेशन सोसायटी या जुन्या शिक्षण संस्थेचे ते तब्बल चाळीस वर्षे अध्यक्ष होते. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे कडवे समर्थक हेाते. नाशिकमध्ये तीळ भांडेश्वर लेनमधील अभिनव भारत ट्रस्टचे ते अध्यक्ष होते.
या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी नाशिकमधील क्रांतीकारकांच्या आठवणींना उजाळा देण्याचा ते सतत प्रयत्न करीत हेाते. नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून ज्ञानदान केले. त्याचे अनेक माजी विद्यार्थी उच्चपदांवर काम करीत आहेत. रहाळकर यांनी शिक्षण संस्था चालकांची मेाट बांधून अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील प्रयत्न केले.