Video: 'गायकवाड निवास' बंगल्यात घुसला बिबट्या, विनविभागाची दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:39 PM2022-01-31T13:39:38+5:302022-01-31T13:46:52+5:30
अथक प्रयत्नांती वन विभागाने बिबट्याला जेरबंद केले आहे. यावेळी, स्थानिक नागरिकांनी बघ्याची भूमिका घेत मोठी गर्दी केली होती.
नाशिक : नाशिक शहरातील जय भवानी रोड परिसरात सकाळी साडे आठ वाजल्यापासून बिबट्याने दर्शन दिले. त्यानंतर, रामजी सोसायटी या भागातील 'गायकवाड निवास' या बंगल्याच्या परिसरामध्ये एका वाहनाखाली बिबट्या दडून बसला होता. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अथक प्रयत्नांती वन विभागाने बिबट्याला जेरबंद केले आहे. यावेळी, स्थानिक नागरिकांनी बघ्याची भूमिका घेत मोठी गर्दी केली होती.
नाशिक - रामजी सोसायटी या भागातील 'गायकवाड निवास' या बंगल्याच्या परिसरामध्ये एका वाहनाखाली बिबट्या दडून बसला होता pic.twitter.com/UuMvfg2v0O
— Lokmat (@lokmat) January 31, 2022
वन विभागाने बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्यावेळी सर्व परिसर पोलिसांनी नागरिकांसाठी प्रतिबंधित केला होता. या भागाकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले. कारण, बिबट्याच्या हल्ल्यात एक वयोवृद्ध नागरिक सुधीर क्षत्रिय हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अखेर वन विभाग आणि पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले. परंतु, बघ्यांची गर्दी आणि त्यात बिबट्यावर नियंत्रण मिळविताना पोलिस आणि वनविभागाची दमछाक होताना दिसून आली. मात्र, बिबट्याला जाळ्यात घेतल्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.