द्वारकाधीश कारखान्याचे विक्रमी ऊस गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:18 AM2018-04-23T00:18:22+5:302018-04-23T00:18:22+5:30
तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने गाळप हंगामात सहा लाख मेट्रिक टन विक्र मी उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८ टक्के मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली.
सटाणा : तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने गाळप हंगामात सहा लाख मेट्रिक टन विक्र मी उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८ टक्के मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली. केंद्र शासन साडेनऊ टक्के साखर उताऱ्यावर कारखाना पोहोच उसासाठी एफआरपी दर निश्चित करते. चालू हंगामासाठी २५५० रुपये प्रतिमेट्रिक टन एफआरपी व त्यापुढील साखर उताºयावरील प्रमाणशीर एक टक्का वाढीसाठी २६८ रुपये प्रतिमेट्रिक टन वाढीव दर असे सूत्र आहे. या सूत्रानुसार कारखान्याने एफआरपीप्रमाणे निव्वळ ऊस दर २ हजार ८० रुपये प्रतिमेट्रिक टन अदा केला असल्याचे अध्यक्ष सावंत यांनी नमूद केले. गेल्या नोव्हेंबरमध्ये गाळप केलेल्या आडसाली उसात साखर उतारा ८.३६ टक्के मिळाला व प्रत्यक्ष ऊसदर २४०० रु पये प्रतिमेट्रिक टन प्रमाणे अदा केला. हंगामात पुढे साखर उताºयात वाढ होत डिसेंबरअखेर १०.७३ टक्के, जानेवारीत ११.३१ टक्के, फेब्रुवारीत सव्वा बारा टक्के, तर मार्चमध्ये १२.०१ टक्के नोंद झाली आहे. ऊसदर ८.३६ टक्के साखर उताºयासाठी व सव्वा बारा टक्के साखर उताºयासाठी सारखाच अदा झाला. ही ऊस दरातील विसंगती योग्य नसल्याचे मत कारखान्याचे अध्यक्ष सावंत यांनी व्यक्त केले.
द्वारकाधीश साखर कारखान्याने कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून १५ जूनपर्यंत शेतकºयांना रोपे तयार करून किंवा प्रमाणित बेणे लावल्यास तयार होणारा दहा महिने कालावधीचा ऊस हंगामाच्या शेवटी गाळप केल्यास सरासरी साखर उतारा १०.४० टक्के व उत्पादन हेक्टरी ६५ मेट्रिक टन मिळाले. तरी या योजनेत जास्तीत जास्त उत्पादकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सावंत यांनी केले आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या एफआरपीनुसार मागणीयोग्य उतारा येईपर्यंत ऊसतोडणी थांबविण्याची मागणी नवापूर येथील आदिवासी उत्पादक शेतकरी रामसिंग गावित यांनी केली.