गावठी दारूच्या भट्या पुन्हा पेटल्या; सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:20 PM2020-04-28T17:20:10+5:302020-04-28T17:26:32+5:30

देशी विदेशीचे दर गगणाला पोहचल्याने गावपातळीवर नदी नाल्यांबरोबरच दºया खोºयांमध्ये निर्मीती केली जाणारी गावठी दारूने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धडाकेबाज कारवाई करीत २१५ गुन्हे दाखल केले आहेत.

 Village bases | गावठी दारूच्या भट्या पुन्हा पेटल्या; सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे

गावठी दारूच्या भट्या पुन्हा पेटल्या; सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे

Next
ठळक मुद्दे भरारी पथकांनी आठ जणांना बेड्या ठोकल्यागावठीच्या भट्या पुन्हा पेटल्या

नाशिक : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉगडाऊन जाहिर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात दारू दुकानेही बंद असल्याने तळीरामांचे पुरते हाल सुरू असले तरी दुसरी कडे अवैध दारूचा सुळसुळाट झाल्याचे वास्तव आहे. चोरी छुपी गावठीचे अड्डे सुरू झाले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल या काळात जिह्यात धाडसत्र राबवित तब्बल सव्वा दोनशेहून अधिक गुन्हे दाखल करीत २१ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.
कोरोना या जीव घेणा-या विषाणूस रोखण्यासाठी सर्वत्र लॉगडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील दारू दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. संचारबंदी जाहिर होताच राज्य उत्पादन शुल्क विभाग पुरता कामाला लागला असून या काळात मद्यवाहतूकीबरोबरच दारूनिर्मीती आणि अवैध विक्री रोखण्यासाठी जिल्हाभरात छापासत्र राबविले जात आहे. जिह्यास लागून असलेला सिमा भाग एक्साईज विभागाने ताब्यात घेतल्याने नजीकच्या केंद्र शासित प्रदेशातून होणारी अवैध दारू रोखण्यात यश आले आहे. लॉकडाऊन काळात बेकायदा मद्यविक्री करतांना आढळून आल्यास थेट परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्याने जिह्यातील दारूची अर्थ व्यवस्था ढासळली आहे. बिअर बारसह देशी आणि वाईन शॉप बंद असल्याने तळीरामांचे हाल सुरू असतांना, वर्षानुवर्षापासून बंद असलेल्या गावठीच्या भट्या पुन्हा पेटल्या आहे. देशी विदेशीचे दर गगणाला पोहचल्याने गावपातळीवर नदी नाल्यांबरोबरच दºया खो-यांमध्ये निर्मीती केली जाणारी गावठी दारूने शहरात शिरकाव केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. या विभागाने २२ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान धडाकेबाज कारवाई करीत २१५ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत भरारी पथकांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या असल्या तरी २०० हून अधिक संशयीत नेहमीप्रमाणे पथकाच्या नाकावर टिच्चून पसार झाले आहेत. जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात एक्साईज विभागाच्या हाती एका वाहनासह तब्बल २१ लाखाहून अधिक मुद्देमाल हाती लागला आहे. त्यात ८०० लिटर गावठी दारू आणि ७६ हजार १६१ लिटर रसायणाचा समावेश आहे. याबरोबरच देशी - विदेशीसह बिअर, ताडी आणि वाईनचाही तुरळक प्रमाणात समावेश आहे.

 

Web Title:  Village bases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.