पावसाच्या दडीने द्राक्षबागेची विस्कटली घडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:48 PM2020-08-04T14:48:16+5:302020-08-04T14:52:25+5:30

ओझर : पावसाच्या दडीमुळे द्राक्ष पिकाची आर्थिक घडी विस्कटते की काय, अशी भीती द्राक्ष बागायतदार व्यक्त करू लागले आहेत. द्राक्षांवरील डावणी रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

The vineyard was whisked away by the rain | पावसाच्या दडीने द्राक्षबागेची विस्कटली घडी

पावसाच्या दडीने द्राक्षबागेची विस्कटली घडी

Next
ठळक मुद्दे छाटणीला उशीर झाल्याने झाडावरील काडी पक्वतेला अडचणी

ओझर : पावसाच्या दडीमुळे द्राक्ष पिकाची आर्थिक घडी विस्कटते की काय, अशी भीती द्राक्ष बागायतदार व्यक्त करू लागले आहेत. द्राक्षांवरील डावणी रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात दोन द्राक्ष पट्टे प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे सटाणा भाग आणि दुसरा म्हणजे दिंडोरी, निफाड, चांदवड, नाशिक व सिन्नर भागाचा समावेश आहे. सटाणा भागातील द्राक्ष ही दरवर्षी अर्ली पीक घेतात त्या भागातील शेतकऱ्याच्या छाटण्या सुरू आहे. त्यामुळे त्यांचे पीक हे डिसेंबरमध्ये तयार होऊन विक्र ीस उपलब्ध असते. त्याचे कारण म्हणजे तेथील हवामान, तर दुसºया पट्ट्यातील द्राक्षबागांचा मागील वर्षीचा हंगाम लेट झाला त्यामुळे एप्रिल छाटणीला उशीर झाल्याने झाडावरील काडी पक्वतेला अडचणी येत आहे. त्यात डावण्याचा प्रादुर्भाव मोठा वाढल्याने बागायतदार चिंतेत सापडला आहे. आता पावसाने दडी मारल्याने हाच पाऊस जर आॅक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बरसल्यास त्याच्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक घडी विस्कटली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. नोव्हेंबरमध्ये सटाणा पट्ट्यात प्लॉट खुडायला येत असल्याने लेट पावसाचा धसका तेथील शेतकऱ्यांना मोठा बसेल यात शंका नाही.

Web Title: The vineyard was whisked away by the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.