पाथरे खुर्दच्या सरपंचपदी विष्णू बेंडकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:20+5:302021-02-26T04:19:20+5:30
पाथरे : पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी विष्णू बेंडकुळे, तर उपसरपंचपदी मंगल दिवाकर मोकळ यांची बिनविरोध ...
पाथरे : पाथरे खुर्द ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदी विष्णू बेंडकुळे, तर उपसरपंचपदी मंगल दिवाकर मोकळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंचपदासाठी विष्णू बेंडकुळे तर उपसरपंचपदासाठी मंगल मोकळ यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी सहाय्यक अभियंता सर्वजनिक बांधकाम विभाग सिन्नरचे पी.एल. घनदास यांनी त्यांची सरपंच व उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. सरपंचपदाचे निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत नवनिर्वाचित नऊ सदस्यांपैकी सात सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला. यात विष्णू बेंडकुळे, दत्तू महादू चिने, दिनकर विठ्ठल गुंजाळ, कुमारी पूनम बाळासाहेब डोंगरे, सीमा सचिन गुंजाळ, सुशीला संजय गिते, मंगला दिवाकर मोकळ हे उपस्थित होते, तर बाबासाहेब जगन्नाथ चिने व सुरेखा योगेश चिने यांनी सभेस उपस्थित राहण्याचे टाळले.
या निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून पी.एल. घनदास तर सहाय्यक अधिकारी ग्रामविकास अधिकारी नितीन मेहेरखांब यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेकामी कामगार तलाठी एन.एन. तरटे, कोतवाल रवि चिने, पोलीस कॉन्स्टेबल डी.जी. मोरे, पोलीसपाटील सुमन माळी, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष गुंजाळ, कैलास माळी, शरद गव्हाणे यांनी सहकार्य केले.
ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन संजीवनी साखर कारखान्याचे माजी संचालक आर.बी. चिने, म्हाडा गृहनिर्माण संस्थेचे माजी संचालक विनायक चिने, माजी सरपंच संजय गिते, रवि चिने, दिवाकर मोकळ, विलास गुंजाळ, विलास डोंगरे, सचिन गुंजाळ यांनी केले. याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- 1 सरपंच- विष्णू बेंडकुळे (२५ पाथरे खुर्द १)
2 उपसरपंच- मंगल दिवाकर मोकळ (२५ पाथरे खुर्द १)
===Photopath===
250221\25nsk_32_25022021_13.jpg
===Caption===
२५ पाथरे खुर्द १/२