मतदार पुनर्निरीक्षण : गृहभेटींचे प्रमाण अत्यल्प असल्याने मागवला खुलासा कामात कुचराई करणाºया तहसीलदारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:52 AM2017-12-16T00:52:09+5:302017-12-16T00:53:01+5:30
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार पुननिरीक्षण मोहिमेत बीएलओंकडून मतदार पडताळणीचे काम करवून घेण्यात कुचराई करणाºया जिल्ह्णातील पाच तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी नोटीस बजावली असून, आयोगाकडून आलेल्या सूचनेचे पालन का झाले नाही याबाबत खुलासा करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिक : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार पुननिरीक्षण मोहिमेत बीएलओंकडून मतदार पडताळणीचे काम करवून घेण्यात कुचराई करणाºया जिल्ह्णातील पाच तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी नोटीस बजावली असून, आयोगाकडून आलेल्या सूचनेचे पालन का झाले नाही याबाबत खुलासा करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासह मृतांची नावे वगळणे, दुरुस्त्या करवून घेणे, संबंधित मतदार तेथेच राहतोय की अन्यत्र याची खातरजमा करवून घेण्याची जबाबदारी बुथ लेव्हल आॅफिसरवर (बीएलओ) सोपविण्यात आली होती. परंतु शिक्षक म्हणून अनेक जबाबदाºया पार पाडणाºया बीएलओंनी या कामाकडे पाठ फिरविली. त्यामुळे १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत अवघे दहा टक्के गृहभेट करून मतदार पुननिरीक्षण पूर्ण झाल्याने प्रशासनाने बीएलओंवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या कामाला गती मिळाली होती. परंतु जिल्ह्णातील पाच मतदारसंघात अपेक्षेपेक्षाही अतिशय कमी गृहभेटी झाल्याचे समोर आले असून, या बीएलओंकडून काम करवून घेण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदारांवर सोपविण्यात आली होती. जबाबदारी पार पाडण्यात काही तहसीलदारांनी हलगर्जीपणा केल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नोंदविले आहे. त्यामुळे मालेगाव मध्य, नाशिक पश्चिम, सिन्नर, निफाड आणि येवला येथील तहसीलदारांना जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.
मतदारात प्रक्रियेविरोधात नाराजी
निवडणूक आयोगाने गृहभेटींद्वारे मतदार पुननिरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी अनेक ठिकाणी आॅनलाइन नोंदणी करणाºया मतदारांपर्यंत बीएलओ पोहचलेले नाहीत. त्यामुळे मतदारांमधूनही मतदार नावनोंदणी प्रक्रिया राबविणाºया प्रक्रियेविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.