नाशिक : शहरात विधानसभा निवडणूक मतदानप्रक्रिया सोमवारी (दि.२१) सर्वत्र शांततेत पार पडली. मतदान प्रकियेत कु ठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चोख नियोजन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले होते. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमुळे सर्वत्र शांततेत मतदान झाले.मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी चोख बंदोबस्ताची आखणी केली होती. अत्यंत सूक्ष्म पद्धतीने शहरातील मतदान केंद्रांच्या इमारती व तेथील बूथचे निरीक्षण करत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात एकूण ३३ संवेदनशील मतदान केंद्रे होती. यामध्ये बी. डी. भालेकर, नागझिरी शाळा, रंगारवाडा शाळेसह सर्वाधिक संवेदनशील केंद्रे नाशिक मध्य मतदारसंघात होती. या प्रत्येक केंद्रावर सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते.मतदान केंद्राच्या परिसरात शंभर मीटर अंतरावरच वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, महाराष्टÑ पोलीस अकादमीचे अपर पोलीस अधीक्षक दीपक गिºहे, पौर्णिमा चौगुले, विजय खरात यांना प्रत्येक ी एक स्ट्रायकिंग फोर्स त्यात दंगल नियंत्रण पथकाचे जवान (आरसीपी) सर्व साधनसामग्री घेऊन वाहनासह सज्ज होते.प्रत्येक उपआयुक्त सगळा लवाजमा सोबत घेत शहराच्या तीनही मतदारसंघांत गस्तीवर होते. विशेषत: संवेदनशील मतदान केंद्रांच्या परिसरात टप्प्याटप्याने दंगल नियंत्रण पथक भेट देत आढावा घेत होते. तसेच सहा सहायक आयुक्तांकडेही संवेदनशील केंद्रांच्या बंदोबस्त व तेथील सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार मतदान केंद्रनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.५४ सेक्टरमध्ये ‘पेट्रोलिंग’नांगरे पाटील यांनी संपूर्ण शहराच्या तीनही मतदारसंघांचे मिळून ५४ सेक्टर तयार केले होते. या प्रत्येक सेक्टरला एक वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आला होता.या अधिकाऱ्यांकडे सेक्टरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह सातत्याने गस्त करत संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली गेली होती. सेक्टरनिहाय पेट्रोलिंग करत आक्षेपार्ह वर्तन व संशयास्पद हालचालींवर पोलीस अधिकारी-कर्मचारी ‘वॉच’ ठेवून होते.गुन्हेगारांवर जरब४शहर गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांसह उपद्रवी लोकांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नियंत्रणाखाली गुन्हे शाखा युनिट-१, युनिट-२, मध्यवर्ती गुन्हे शाखांचे पथके शहरातील झोपडपट्ट्यांच्या परिसरात लक्ष ठेवून होते. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हालचाली सूक्ष्मरीत्या टिपल्या गेल्या.
कडेकोट सुरक्षेत शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 2:00 AM