प्रतीक्षा संपली : कुस्ती, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, टेनिस, क्रिकेटचे सामने रंगणार महापौर चषक स्पर्धेचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:13 AM2018-01-13T01:13:08+5:302018-01-13T01:14:04+5:30

नाशिक : रखडलेल्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांना मुहूर्त लागला असून, यंंदा महोत्सवांतर्गत कुस्ती, फुटबॉल, जिम्नॅस्टिक आणि टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Waiting: Wrestling, Football, Gymnastics, Tennis, Cricket matches to be played | प्रतीक्षा संपली : कुस्ती, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, टेनिस, क्रिकेटचे सामने रंगणार महापौर चषक स्पर्धेचा वाजला बिगुल

प्रतीक्षा संपली : कुस्ती, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, टेनिस, क्रिकेटचे सामने रंगणार महापौर चषक स्पर्धेचा वाजला बिगुल

Next
ठळक मुद्देकाही वर्षांपासून सर्वच क्रीडा स्पर्धा बंद फेबु्रवारी महिन्यात स्पर्धा

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांना अखेर मुहूर्त लागला असून, यंंदा या महोत्सवांतर्गत कुस्ती, फुटबॉल, जिम्नॅस्टिक आणि टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा विविध विभागांमध्ये घेण्यात येणार आहेत. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सर्वप्रथम महापौर चषक कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर कुस्ती स्पर्धा सुरू झाल्या. कालांतराने वेगवेगळ्या स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांपासून सर्वच क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा सत्ताधिकारी भाजपाने महापौर चषक भरविण्याचा चंग बांधला
आहे. यासंदर्भात स्थायी समितीच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत विविध स्पर्धांची माहिती देण्यात आली. उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार, शाहू खैरे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. फेबु्रवारी महिन्याच्या दुसºया किंवा तिसºया आठवड्यात स्पर्धा होणार आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर महाराष्टÑ राज्य जिम्नॅस्टिक अजिंक्यपद व निवड चाचणी होणार आहे. पुरुष व महिला किशोर-किशोरी गटांत या स्पर्धा होणार असून, सहा गटांत सुमारे ९०० खेळाडू यात सहभागी होणार आहेत. सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात या स्पर्धा होणार आहेत. यानिमित्ताने खेळाडूंची शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार असल्याची माहिती शाहू खैरे यांनी दिली, तर नाशिकरोड येथील जिमखाना मैदानावर महापौर चषक फुटबॉल स्पर्धा भरविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर यांनी
दिली. कुस्ती स्पर्धेची माहिती तालीम संघाचे संजय चव्हाण यांनी दिली, तर महापौर चषक क्रिकेट स्पर्धेची माहिती प्रशांत दिवे यांनी दिली. यावेळी उद्धव निमसे, अर्जुन टिळे, सुुनील धोपावकर, निखिल पंडित, मंदार देशमुख, सुधीर पैठणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Waiting: Wrestling, Football, Gymnastics, Tennis, Cricket matches to be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.