लोकमत न्यूज नेटवर्कवैतरणानगर : येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत गजाबाई वाणी यांनी प्रथम, तर नूरजहॉँ शेख व भारती पादीर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.वैतरणा येथे कुर्णोली, वैतरणा, आहुर्ली केंद्रातील सर्व शाळेतील शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्यासाठी इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने पाककृती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत वैतरणा, आहुर्ली आणि कुर्णोली केंद्रातील महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद नोंदवला. प्रत्येकाने बनविलेली शाकाहारी व मांसाहारी दोन्ही विभागातील रेसिपी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. परीक्षक म्हणून वैतरणा विद्यालयातील रवींद्र मनोरे, विद्या पावणे, सविता पवार, एन.डी. भारंबे यांनी काम पाहिले. यावेळी पाककृतीमधून तीन स्पर्धक निवडण्यात आले. त्यात प्रथम क्र मांक गजाबाई राजेंद्र वाणी (वाकी शाळा) रु. ५०१ व साडी, द्वितीय नूरजहाँ अन्वर शेख (वैतरणा शाळा) रु. ३०१ व साडी तर तृतीय भारती विठ्ठल पादीर (देवळाची वाडी शाळा) यांना रु. २०१ व साडी देऊन वाळविहीरचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी रामकृष्ण पाटील, रेखा देवरे, चिंतामण गांगुर्डे, नीता वसावे, श्रावण लोते, वसंत पोटकुले, रोंगटे, दीपक भदाणे व शिक्षकवृंद उपस्थित होते. गजाबाई वाणी यांचे गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, सिद्धार्थ निकुंभ, भरत चव्हाण, पांडुरंग नाईक, तुळसा जाखेरे, संतोष कुंभार आदींनी कौतुक केले. प्रास्तविक विद्या पाटील यांनी केले. सूत्रसंचलन नांदूरकर यांनी तर आभार मोनाली देशमुख यांनी मानले.
बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत वाकीच्या गजाबाई वाणी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:08 AM
वैतरणानगर : येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित बीटस्तरीय पाककृती स्पर्धेत गजाबाई वाणी यांनी प्रथम, तर नूरजहॉँ शेख व भारती पादीर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
ठळक मुद्देवैतरणानगर : नूरजहॉँ शेख द्वितीय; भारती पादीर तृतीय