नाशिक : सीमेंट कॉँक्रीटची जंगले जरी निर्माण होत असली तरी या जंगलांमध्ये हिरवीगार बाग फुलविणे सहज शक्य आहे आणि त्यासाठी गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची. शहरातील कचरा व्यवस्थापनाला परसबागेची जोड देणे काळाची गरज आहे, असा सूर नाशिकच्या बागप्रेमींमधून उमटला.निमित्त होते, शहरातील सुमारे शंभराहून अधिक बागप्रेमी एकत्र येत आयोजित केलेल्या संमेलनाचे. रविवार कारंजावरील पेठे विद्यालयात रविवारी (दि.४) हे आगळेवेगळे संमेलन पार पडले. सांडपाण्याची विल्हेवाट, वेळेचा सदुपयोग, स्वच्छ वातावरण निर्मितीमुळे निरोगी आरोग्य लाभते. अशाप्रकारे परसबागेमुळे अनेक समस्यांचे निराकरण होण्यास परसबाग कारणीभूत ठरते. घरातला ओला कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून बाहेर फेकला जातो. कालांतराने त्याचा एकप्रकारे जिवंत बॉम्ब तयार होतो आणि तो बेततो निष्पाप मुक्या प्राण्यांवर. म्हणून त्यावर उपाय काय तर कचºयाचे विघटन करून त्याचा पुनर्वापर. बायोकल्चर, कंपोस्ट खत, गांडूळ खत, बायोमास अशा विविध पर्यायांवर मंथन करण्यात आले.कचरा व्यवस्थापनाच्या पर्यावरणपूरक उद्देशासोबत परसबाग, गच्ची, बाल्कनी जेथे जागा मिळाली तेथे हिरवा कोपरा बागप्रेमींनी साकारला आहे. फुलझाडे, शोभेच्या रोपांसोबत दैनंदिन वापरातील ताजा भाजीपाला संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी कसा पिकविता येतो, याबाबत आपले अनुभव यावेळी मांडले. दरम्यान, कंपोस्ट प्रक्रि येच्या साहित्याचे प्रदर्शन व शास्त्रीय विवेचन यावेळी करण्यात आले.
कचरा व्यवस्थापनाला द्यावी परसबागेची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 10:59 AM
शहरातील कचरा व्यवस्थापनाला परसबागेची जोड देणे काळाची गरज
ठळक मुद्देगच्ची, बाल्कनीवर बाग फुलविणाºया बागप्रेमींचे संमेलन