निरगुडे येथील जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:56 AM2019-07-14T01:56:19+5:302019-07-14T01:56:33+5:30
पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, निरगुडे गावाच्या तलाव परिसरात शुक्रवारपासून खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येताना दिसून येत आहेत.
पेठ : तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, निरगुडे गावाच्या तलाव परिसरात शुक्रवारपासून खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येताना दिसून येत आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या भागात लहान-मोठे भूकंपसदृश धक्के बसत असल्याने आधीच घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून जमीन व खडकातून कोणतातरी वायुसदृश पदार्थ बाहेर येत असल्याने पाण्यावर बुडबुडे येताना स्पष्टपणे दिसत असल्याने भूगर्भात काहीतरी हालचाली सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत तहसीलदार हरीष भामरे यांनी निरगुडे येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यासंदर्भात मेरी येथील भूगर्भअभ्यासक विभागाला कळविण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (फोटो १३ पेठ, पेठ१)
प्रतिक्रि या -
निरगुडे व परिसरात खडक व जमिनीतून पाण्याचे बुडबुडे येत असल्याचे समजल्यावर घटनास्थळी तलाठी व कर्मचाऱ्यांसह भेट दिली असता प्रथम दर्शनी घाबरून जाण्यासारखे नाही. सदर बुडबुडे गरम नसल्याचे दिसून येते. मेरीच्या संबंधित विभागाला याबाबत कळविले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये.
- हरीष भामरे, तहसीलदार, पेठ
पेठ तालुक्यातील निरगुडे गावानजीक जमीन व खडकातून वायुसदृश बुडबुडे बाहेर येताना दिसत असून, दुसºया छायाचित्रात घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा करताना तहसीलदार हरिष भामरे.