डोंगरगाव तलावाचा पाणीप्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:40+5:302021-02-24T04:16:40+5:30
जगन्नाथ पवार, अण्णा पवार, रखमा पवार, साहेबराव उंडे आदी भुलेगाव, देवठाण येथील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी येथील पाटबंधारे ...
जगन्नाथ पवार, अण्णा पवार, रखमा पवार, साहेबराव उंडे आदी भुलेगाव, देवठाण येथील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवार, (दि. २३) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार पोलीस फौजफाट्यासह पाणी सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी सोडू नका असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अधिकारी वर्गाला परत फिरावे लागले. पाणी सोडल्यास परिसरातील गावातील आबालवृद्ध शेतकरी आमरण उपोषण करतील असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर दत्तात्रय सोमासे, बाळासाहेब आरखडे, रामनाथ आरखडे, सुरेश कुऱ्हे, ज्ञानेश्वर सोमवंशी, संतोष राऊत, साईनाथ ढोकळे, रमेश ढोकळे, गौतम पगारे, साईनाथ मोहन, मारुती सोमासे, जालिंदर सोमवंशी, खलील पटेल, शकील पटेल, कचरू मोहन, दत्तू रोठे, माधव उंडे, पोपट मोहन, साहेबराव सोमवंशी आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
इन्फाे
शेतकरी आक्रमक
येत्या चार दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कडून पाणी न सोडण्याचे लेखी आदेश न आल्यास शुक्रवारी, (दि. २७) पाणी सोडू असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने पाणी सोडू नका असे म्हणणारे शेतकरी आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येथील कार्यालयास या शेतकऱ्यांनी पाणी न सोडण्याबाबत स्वीय सहायक भगवान लोंढे यांना निवेदन दिले.
फोटो- २३ डोंगरगाव-१ पाणी सोडा या मागणीसाठी उपोषणास बसलेले शेतकरी
२३ डोंगरगाव -२
पाणी सोडू नये यासाठी तलावावर ठिय्या देऊन बसलेले शेतकरी.
===Photopath===
230221\23nsk_59_23022021_13.jpg~230221\23nsk_60_23022021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ डोंगरगाव-१पाणी सोडा मागणीसाठी उपोषणास बसलेले शेतकरी ~२३ डोंगरगाव -२ पाणी सोडू नये यासाठी तलावावर ठिय्या देवून बसलेले शेतकरी