जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा जलशुध्दीकरण केंद्र अभ्यास दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:49 PM2019-02-26T17:49:06+5:302019-02-26T17:51:01+5:30

खामखेडा : खामखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट देवून तेथील कामकाज पध्दती समजावून घेतल्या. खामखेडा येथक्षल जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तेथक्षल जलशुध्दीकरण केंद्रास भेट दिली.

Water purification center study tour for students of Zilla Parishad School | जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा जलशुध्दीकरण केंद्र अभ्यास दौरा

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा जलशुध्दीकरण केंद्र अभ्यास दौरा

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी एटीएम मशीनद्वारे पाणी काढून पाहिले व त्याचा वेगळाच प्रत्यक्ष अनुभव घेतला.

खामखेडा : खामखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट देवून तेथील कामकाज पध्दती समजावून घेतल्या.
खामखेडा येथक्षल जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तेथक्षल जलशुध्दीकरण केंद्रास भेट दिली.

यावेळी तेथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने पाणी शुद्धीकरण यंत्र व पाणी कसे शुद्ध होते? पाणी एटीएमच्या स्वरूपात कसे पाणी केले जाते?, शुद्ध पाणी बॅरल मध्ये कसे घेतले जाते? याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी एटीएम मशीनद्वारे पाणी काढून पाहिले व त्याचा वेगळाच प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी शुद्धीकरणयंत्राच्या प्रत्येक उपकरणाची माहिती विविध प्रश्न विचारुन समजून घेतली. यावेळी मुख्याध्यापक सुलोचना भामरे, संगीता सूर्यवंशी, चित्रा सोनवणे, आबा शेवाळे आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी खामखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उखड्याबाई पवार, उपसरपंच बापू शेवाळे, कारखान्याचे माजी संचालक अण्णा पाटील, संजय मोर, ग्रामसेवक व्ही. व्ही. सोळशे, सुनील शेवाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट....
पुस्तकातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील सुविधा म्हणजे ग्रामपंचायत पाणीपुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा या शासनाने पुरविलेल्या सर्व सुविधा याविषयी माहिती शिकवीत असतांना हे प्रत्यक्ष भेट देऊन विद्याथ्यांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने खामखेडा गावातील पाणी शुद्धीकरण यंत्र यास भेट देत अभ्यासदौरा करण्यात आला.

Web Title: Water purification center study tour for students of Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.