पाण्याचे स्रोत शुद्धिकरणाचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:12 AM2018-06-22T00:12:05+5:302018-06-22T00:12:05+5:30

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्रोत शुद्धिकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.

Water purification work on the battlefield | पाण्याचे स्रोत शुद्धिकरणाचे काम युद्धपातळीवर

पाण्याचे स्रोत शुद्धिकरणाचे काम युद्धपातळीवर

Next
ठळक मुद्देसिन्नरला पालिकेतर्फे अभियान पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील जलकुंभ, पाण्याच्या टाक्या व पाण्याचे स्रोत शुद्धिकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.
पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारपासून (दि. २०) तालुक्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ टाकी स्वच्छता व हातपंप शुद्धिकरण अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा आणि जलजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा मिळण्यास मदत होईल.
दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमित शुद्धिकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत तालुका व ग्रामपंचायत यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, जिल्हा पाणी गुणवता निरीक्षक, विस्तार अधिकारी, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार, गटसमन्वयक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहाय्यक, जल सुरक्षारक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.४५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताबुधवारी तालुक्यातील दातली, चिंचोली, मोह, खडांगळी, सोनांबे, मुसळगाव, कारवाडी, देशवंडी, गुरेवाडी, नांदूरशिंगोटे, रामनगर, वडझिरे, भरतपूर, खंबाळे आदींसह ४० ते ४५ ग्रामपंचायतींमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. ज्या स्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते त्याचे तसेच हातपंपाचे शुद्धिकरण करण्यात आले. त्यावर शुद्धिकरण करणाची तारीख नमूद करण्यात आली आहे.

Web Title: Water purification work on the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.