येवला तालुक्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:27 PM2018-03-13T17:27:33+5:302018-03-13T17:27:33+5:30
येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागली असून मार्च महिन्याअखेर पाणी टंचाईची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे.
येवला : तालुक्यात पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागली असून मार्च महिन्याअखेर पाणी टंचाईची व्याप्ती वाढणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे.पूर्व भागातील स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा करणाºया विहिरीचे श्रोत आटले असून पाणीटंचाईची तीव्रता वाढायला लागली आहे. तालुक्यातील बाळापुर, कुसुमाडी, चांदगाव, खैरगव्हाण, आहेरवाडी, कासारखेडे, पिंपळखुटे तिसरे, गोपाळवाडी या आठ गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी मंजूर केले असून, चार टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.यापैकी दोन शासकीय टँकर येवल्यात पोहचले असून पाच गावे व एका वाडीला प्रत्येकी एक खेप शुक्र वारी सुरु झाली आहे.आगामी दोन दिवसात दोन शासकीय पाणीपुरवठा टँकर उपलब्ध होण्याची माहिती आहे.येवला पंचायत समतिीने पाठवलेले कोळगाव,वाईबोथी, गुजरखेडे,ममदापूर या चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.याची मंजुरी येताच पाणीपुरवठा सुरु केला जाणार आहे.
-------------------
खिर्डीसाठे,अनकाई, वसंतनगर,गोरखनगर,सायगाव (महादेववाडी ) अशी चार गावे व एक वाडी यांचे पाणी टँकरच्या मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समतिीकडे आला आहे.पाणीटंचाई संदर्भाने स्थळ तहसील व पंचायत समतिी स्तरावरील स्थळ पाहणी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
---------------
पूर्व भागात रेंडाळे,कोळम खुर्द,कोळमबुद्रुक,डोंगरगाव,आडसुरेगाव,भुलेगाव
,पांजरवाडी,धामणगाव,खामगाव,देवठाण,तळवाडे,गणेशपूर,लहीत,हडपसावरगाव,नगरसूलच्या वाडीवस्ती,पन्हाळसाठे,या गावांना देखील सध्या पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणावर बसू लागली आहे.