संपुर्ण शहराचा गुरूवारी पाणीपुरवठा होणार खंडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:16 PM2020-07-06T18:16:37+5:302020-07-06T18:17:04+5:30

गंगापूर धरण पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून पाण्याचे पंपींग केले जाणार नसल्याची माहित्री पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

The water supply of the entire city will be cut off tomorrow! | संपुर्ण शहराचा गुरूवारी पाणीपुरवठा होणार खंडीत!

संग्रहित छायाचित्र

Next

नाशिक : शहर व परिसराचा गुरूवारी  (दि.9) सकाळी सहा ते नऊ वाजेदरम्यान होणारा दैनंदिन पाणीपुरवठा नाशिक महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून खंडीत करण्यात येणार आहे. गंगापूर धरणाच्या जॅकवेलला जोडणारी वीजवाहिनी भूमिगत करणे व मुकणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व बदलणे या अतीगरजेच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
गंगापूर धरणाच्या रॉ-वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील 132 केव्ही सातपूर व 132 केव्ही महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरु न जॅकवेलसाठी 33 केव्ही वीज पुरवठा कार्यान्वित आहे. सदर ओव्हरहेड वीजवाहिनी वीज वितरण कंपनीद्वारे केबल टाकून भूमिगत करण्यात येणार आहे. त्याकरीता महावितरण कंपनीला कामे सुलभरित्या करता यावे, म्हणून गुरु वारी वीज पुरवठा बंद ठेवणार आहे. त्यामुळे जॅकवेल सुरू करणे शक्य होणार नाही. तसेच पाथर्डीफाटा येथे पाणी पुरवठा वितरण विभागाकडून व्हॉल्व बसविणेचे काम करणे गरजेचे असल्याने मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
त्यामुळे गंगापूर धरण पंपींग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून पाण्याचे पंपींग केले जाणार नसल्याची माहित्री पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे गुरु वारी संपूर्ण नाशिक शहरातील सकाळचा व सायंकाळचा पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. शुक्रवारी (दि.१०) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करत प्रशासनला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: The water supply of the entire city will be cut off tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.