मालेगाव शहराच्या पश्चिम भागात १७ तास उशिराने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:42 PM2018-12-12T14:42:44+5:302018-12-12T14:42:53+5:30
संगमेश्वर : संगमेश्वर जलकुंभाच्या व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने शहराच्या पश्चिम भागात पाणीपुरवठा विस्कळीत होवून १७ तास उशिराने शहरवासियांना पाणी मिळणार आहे.
संगमेश्वर : संगमेश्वर जलकुंभाच्या व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने शहराच्या पश्चिम भागात पाणीपुरवठा विस्कळीत होवून १७ तास उशिराने शहरवासियांना पाणी मिळणार आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने युद्ध पातळीवर दुरूस्तीचे काम पुर्ण केले आहे.शहराच्या सटाणा रोडवरील लोढा मार्केटनजीक व्हॉल्व नादुरुस्त झाला होता. जलवाहिनी जुनी असल्याने काम करण्यात अनेक अडचणी आल्या. महापालिकेचे पाणीपुरवठा उपअभियंता सचिन माळवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर प्रभागाचे अभियंता जयपाल त्रिभुवन, अकिल व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न करून दुरुस्ती केली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता काम आटोपल्यानंतर उशिराने पाणीपुरवठा सुरू केला आहे. शहराच्या एकतानगर, आंबेडकरनगर, श्रीरामनगर, टिळकनगर, बारा बंगला, संगमेश्वर आदि भागाला आज होणारा पाणीपुरवठा तब्बल १७ तास उशिराने झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.