नाशकात ६४१ थकबाकीदारांचे पाणी केले बंद
By Suyog.joshi | Published: April 1, 2024 07:19 PM2024-04-01T19:19:37+5:302024-04-01T19:20:31+5:30
५० हजार रुपयांच्यावर असलेल्या थकबाकीदरांचे थेट नळ कनेक्शन तोडण्यात आले.
नाशिक: थकबाकीदारांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा एकदा बडगा उगारला असून महिनाभरात तब्बल ६४१ नळ कनेक्शन तोडले आहेत. यात सिडकोत २९८ सर्वाधिक थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यात आली. शहरात सुमारे दोन लाख नळ धारक आहे. त्याच काही घरगुतीसह व्यवसायिक वापराचे देखील नळ जोळणी आहे. मात्र नाशिक मनपाची पाणीपट्टीच्या पोटी तब्बल थकबाकी झाल्याने मार्च एन्डच्या अनुशंगाने मनपा कर व पाणी पुरवठा विभागाने सक्तीची वसुली मोहीम हाती घेतली होती. ५० हजार रुपयांच्यावर असलेल्या थकबाकीदरांचे थेट नळ कनेक्शन तोडण्यात आले.
२२ फेब्रुवारी २०२४ पासून मनपाने नळ तोड मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी १५ स्वतंत्र पथके निर्माण करुन प्रत्येक पथकात एका अधिकाऱ्यांसह एकूण चार जणांचा समावेश आहे. विशेेष म्हणजे एक प्लंबर देखील सोबत होते. या मोहीमेत शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांचे नळकनेक्शन तपासण्यात आले.संयुक्त मोहिमेअंतर्गत ६४१ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. शहरात एकूण दोन लाख सात हजार इतके नळजोडणी मालमत्ताधारक आहेत. यापैकी ४४ हजार ३८५ नळ जोडणीधारक थकबाकीदार असून, त्यांच्याकडे पाणीपट्टी थकीत आहे. मनपाच्या कर विभागाकडून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टीची वसुली करण्यात आली .या दोन्ही विभागांनी आता संयुक्त मोहीम हाती घेत थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.
अशी झाली कारवाई
- विभाग नळ कनेक्शन
- पंचवटी ८२
- पूर्व ०८
- नाशिकरोड ११४
- सातपूर १३३
- सिडको २९८
- नाशिक पश्चिम ०६
- एकूण ६४१