...आम्हाला हवे घामाचे दाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:43+5:302021-06-18T04:10:43+5:30
या आहेत प्रमुख मागण्या.... १) आशा स्वयंसेविकांना रविवारसह आठवड्यातील सातही दिवस काम करावे लागते. त्यामुळे त्यांची परिस्थिती वेठबिगारी व ...
या आहेत प्रमुख मागण्या....
१) आशा स्वयंसेविकांना रविवारसह आठवड्यातील सातही दिवस काम करावे लागते. त्यामुळे त्यांची परिस्थिती वेठबिगारी व गुलामसदृश झाली आहे. त्यांना सवलत मिळावी.
२) आशा पर्यवेक्षक यांना मागील थकीत मानधन त्वरित द्यावे
३) कोरोना आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा
४) अन्य मागण्या मान्य होईपर्यंत आशा स्वयंसेविकांना १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना २२ हजार प्रतिमहा वेतन देण्यात यावे.
५) दरमहा कायम व निश्चित स्वरूपाची ३ हजार रुपये वाढ केलेली आहे. ही वाढ बहुतांश जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर २०२० पासून मिळालेली नाही. ती विनाविलंब देण्यात यावी.
६) माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा मोबदला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना पूर्णतः देण्यात आलेला नाही.
७) तिसऱ्या टप्प्याचे काम देण्यात आले असून, त्याचा मोबदला निश्चित करण्यात यावा.
८) कोरोनाबाधित झालेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विनामूल्य उपचार देण्यात यावा.
९) आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले आहे. त्यात आशा व पर्यवेक्षकांचा समावेश करण्यात यावा.
१०) पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग व सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा. आरोग्यवर्धिनी अंतर्गत कामाचा मोबदला द्यावा.
११) प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे अतिरिक्त काम गटप्रवर्तकांना सांगण्यात येऊ नये, प्रेरणा प्रकल्पाच्या स्टेशनरीसाठी ३ हजार रुपये देण्यात यावे.
१२) रिक्त पदे भरतीत प्रथम प्राधान्य मिळावे, आरोग्यसेविका पदभरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे
१३) योजनाबाह्य कामे सांगण्यात येऊ नये, मास्क, हॅण्डग्लोझ, सॅनिटायझर नियमितपणे देण्यात यावी
१४) दरमहा मानधन जमा करत असताना हिशेब पावती देण्यात यावी. थकीत मानधन त्वरित देण्यात यावे.