नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने नाशिक शहरात निर्बंध शिथिल झाले असले तरी वीकेंड लॉकडाऊनमध्ये मंगल कार्यालये आणि लॉन्सदेखील समाविष्ट करण्यात आल्याने चार विवाह मुहूर्त लॉकडाऊनमध्ये अडकणार असल्याने त्यात शिथिलता द्यावी, अशी मागणी नाशिक मंगल कार्यालय लॉन्स व हॉल असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. ९) करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. उद्धव निमसे, अध्यक्ष सुनील चेापडा, कार्याध्यक्ष संदीप काकड तसेच शंकरराव पिंगळे, समाधान जेजूरकर, केशव डिंगोरे यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात अडचणी मांडल्या आहेत.
१६ जून ते १३ जुलै दरम्यान केवळ दहा विवाह मुहूर्त आहेत. त्यातील चार विवाह मुहूर्त हे शनिवार आणि रविवार असे आहेत. त्यामुळे ज्यांच्या विवाह तारखा याच शनिवारी आणि रविवारी आहेत, त्यांची अडचण होत आहे. निर्बंधांमुळे अशा कुटुंबीयांना आता विवाह सोहळे पुढे ढकलावे लागणार आहेत. त्यामुळे आरोग्य नियमांचे पालन करून विवाह सोहळ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
छायाचित्र ०९ लॉन्स...नाशिक शहरातील विवाह सोहळ्यांना शनिवार- रविवारी देखील परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन आयुक्त कैलास जाधव यांना देताना उद्धव निमसे, सुनील चोपडा, संदीप काकड, शंकरराव पिंगळे, समाधान जेजूरकर, केशव डिंगोरे, आदी.