हरिनामाचा गजर करत दिंडीचे पास्ते येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:13 AM2018-07-02T01:13:19+5:302018-07-02T01:13:33+5:30

नायगाव : संबळ-पिपाणीचा मंगलमय सूर....फटाक्यांची आतषबाजी.... हरिनामाचा गजर करत..... संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे स्वागत केले.

Welcome the hinges on the hindima | हरिनामाचा गजर करत दिंडीचे पास्ते येथे स्वागत

हरिनामाचा गजर करत दिंडीचे पास्ते येथे स्वागत

Next
ठळक मुद्देपास्तेकरांनी तीन किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन निरोप दिला.

नायगाव : संबळ-पिपाणीचा मंगलमय सूर....फटाक्यांची आतषबाजी.... हरिनामाचा गजर करत..... संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या दिंडीचे सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे स्वागत केले.
नागमोडी घाटाची अवघड चढण करत सिन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या पायी दिंडीचे संबळ-पिपाणीच्या मंगलमय धून वाजवत फटाक्यांची आतषबाजी करून हरिनामाचा जयघोष करत पास्ते ग्रामस्थांनी वारकºयांचे स्वागत केले.
येथील व्ही. एन. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात त्र्यंबकराजांची पालखी विसावली. यावेळी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भाऊलाल घुगे, सरपंच गोरख हांडे, उपसरपंच शरद आव्हाड व भजनी मंडळाने दिंडीचे स्वागत केले. सकाळपासून पास्ते, जामगाव, खापराळे, सरदवाडी, सिन्नर आदी गावांतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भजनी मंडळ व ग्रामस्थांनी वारकºयांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो वारकºयांबरोबर भाविकांनीही भोजनानंतर भजनाचा आनंद घेतला.
यावेळी भजनी मंडळातील सदस्यांसह माजी सरपंच नवनाथ घुगे, शांताराम आव्हाड, दिगंबर घुगे, श्रीधर आव्हाड, नवनाथ आव्हाड, सोपान घुगे आदींसह ग्रामस्थ उपस्थिती होते.दुपारी दोन वाजेच्या सुमारास पालखीची गावातून टाळ मृदंगाचा गजर... ज्ञानोबा... ज्ञानोबा, विठ्ठल ... विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रदक्षिणा पार पडली. हजारो वारकºयांना गावाच्या शिवरस्त्यापर्यंत निरोप देण्यासाठी अवघ्या पास्तेकरांनी तीन किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन निरोप दिला.

Web Title: Welcome the hinges on the hindima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक