कळसूबाईवर तिरंगा फडकवत नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:13 PM2021-01-01T23:13:19+5:302021-01-02T01:15:19+5:30

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाईवर चढाई करत तिरंगा फडकाविला.        

Welcoming the New Year by waving the tricolor on Kalsubai | कळसूबाईवर तिरंगा फडकवत नववर्षाचे स्वागत

कळसूबाई शिखरावर नवीन वर्षाचे स्वागत तिरंगा फडकावून करताना कळसूबाई मित्र मंडळाचे सदस्य.

Next

घोटी : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाईवर चढाई करत तिरंगा फडकाविला.            गिर्यारोहकांनी पहाटे ५ वाजेला शिखराची चढाई केली. मंदिराच्या परिसराची स्वच्छता करून कळसूबाई मातेचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी कळसूबाई मातेला सृष्टीला कोरोनामुक्त करण्याचे साकडे घालण्यात आले. शिखरावर आलेल्या अपंग,अंध गिर्यारोहकांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, अशोक हेमके,प्रवीण भटाटे,बाळू आरोटे, नीलेश पवार, प्रशांत जाधव, सोमनाथ भगत,उमेश दिवाकर, आदेश भगत,संकेत वाडेकर,रोशन लहाने,भगवान तोकडे,देविदास पाखरे, शिवाजी गाढे,सागर बोडके व इतर अपंग गिर्यारोहक सहभागी झाले होते.

 

 

 

Web Title: Welcoming the New Year by waving the tricolor on Kalsubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.