भीज पाऊस व ढगाळ हवामानाने मुगाला फुटले कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 06:11 PM2020-08-26T18:11:30+5:302020-08-26T18:13:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : परिसरात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून होत असलेल्या भीज पावसाने तोडणीसाठी आलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुगाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून ढगाळ व दमट वातावरणाने सोयाबीन पिकावर भुंगा, अळी व शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव तर मका बिटीवर अमेरिकन अळीचा विळखा वाढला आहे. तसेच भीज पावसाने मका व बाजरी आडवी झाली असून टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे. याबरोबरच लागवड योग्य कांदा रोपेही या पावसाने खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : परिसरात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून होत असलेल्या भीज पावसाने तोडणीसाठी आलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुगाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून ढगाळ व दमट वातावरणाने सोयाबीन पिकावर भुंगा, अळी व शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव तर मका बिटीवर अमेरिकन अळीचा विळखा वाढला आहे. तसेच भीज पावसाने मका व बाजरी आडवी झाली असून टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे. याबरोबरच लागवड योग्य कांदा रोपेही या पावसाने खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
यंदा सुरु वातीपासूनच समाधानकारक पावसाने खरीपाची पिके जोमदार आली आहे. मात्र, सध्या सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढला असून अळ्यांनी पाने खाल्याने पानांची चाळणी झाली आहे. फुलोऱ्यातील सोयाबीनची फुले तसेच शेंगा या अळ्यांनी कुरतडून टाकल्याने उत्पन्नात मोठी घट येण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वर्ग उंच वाढलेल्या सोयाबीन पिकात आपला जीव धोक्यात घालून औषधांची फवारणी करतांना दिसत आहे.
मुगाचे पिक साधारणत: दोन सव्वा दोन मिहन्यात काढणीसाठी येत असल्याने कांद्याच्या क्षेत्रात मुगाची मोठया प्रमाणात लागवड परिसरात केली जाते. यातून शेतीही चांगली राहाते तसेच शेतीसाठी भांडवल उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग मुगाची लागवड करीत असतात मात्र सततच्या भीज पावसाने हे पिक खराब झाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे.
यावर्षी सोयाबीन बियाणे खराब निघाल्याने शेतकर्?यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली असे असले तरी समाधानकारक पावसाने पिक चांगले आले आहे.
दोन दिवसांपासून परिसरात पावसाने उघडीप दिली असल्याने बाजरीची कापणी तसेच कांदा लागवडीसाठी शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे.
चौकट -
सुरु वातीपासूनच समाधानकारक पाऊस पडत असल्याने पिके चांगली आली मात्र पिकांची फक्त वाढच झाली आहे. विविध किडी व रोगांमुळे सोयाबीनला शेंगा कमी आल्या असून आलेल्या शेंगाही अळींनी कुरतडल्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे.
- अनिल कव्हात, सोयाबीन उत्पादक शेतकरी, ठाणगाव.
(फोटो २६ पाटोदा, २६ पाटोदा २))