मालेगाव (शफिक शेख) : शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण व्हायचे नाव घेत नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली शहरातील नागरिक वाहतूक कोंडी सहन करीत आहेत. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून सुपर मार्केटपासून दरेगावपर्यंत होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने केवळ एकेरी वाहतूक सुरू आहेत. त्यामुळे एकतर्फी वाहतूक आणि रस्त्याची आधीच असलेली वाईट अवस्था त्यावर पडलेल्या वाहनांच्या अतिरिक्त भारामुळे रस्त्याची अवस्था नकोशी झाली आहे. त्यात आणखी पावसाळा सुरू झाल्याने महामार्गावर पडलेले खड्डे शोधून तर सापडत नाहीत, ते सापडतात खड्ड्याचा अंदाज न आल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आदळलेल्या वाहनामुळे !
खरे तर मनमाड चौफुलीपासून शहरातून जाणारा रस्ता नागरिकांसाठी वाहतुकीसाठी मोकळा सोडून मनमाड चौफुली ते दरेगाव असा उड्डाणपूल करण्याची आवश्यकता असताना केवळ नवीन बसस्थानक परिसरात छोटासा पूल उभारण्यात कुणाचे काय स्वारस्य किंवा दूरदृष्टी हे समजू शकले नाही.
-----------------
रस्त्यावर मोठे खड्डे
मुंबई, पुणे, नाशिककडून भरधाव येणाऱ्या बस आणि वाहने यांना मालेगावपर्यंत यायला जितका वेळ लागत नसेल त्यापेक्षा जास्त वेळ गावातून दरेगाव भागात महामार्गावर जायला लागतो. त्यात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने बस हेलकावे खात जातात आणि बस शेजारून जाणाऱ्या दुचाकीस्वार, पादचारी यांना बस आपल्या अंगावर तर पडणार नाही ना अशी भीती वाटते ती वेगळीच.
------------------
अपघात नित्याचेच
या रस्त्यावर होणारे अपघात तर पाचवीलाच पुजलेले ! साडेनऊ कोटींच्या खर्चाचा उड्डाणपूल शहरातील नागरिकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. पुलामुळे काय साध्य होणार आहे. कारण पूल जिथे संपतो तेथून पुढे जाफरनगर नवीन फारान हॉस्पिटलपर्यंत नागरी वस्ती वाढलेली आहे. त्या नागरिकांची गैरसोय होणार नाही का, याचा विचार संबंधितांनी केला पाहिजे.
-------------------------
आधीच अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम ठेकेदार करीत आहेत. त्याला समज देऊन पुलाचे काम आधी करून पूर्ण करून घेण्याची गरज आहे. अवजड वाहनांना गावातून प्रवेश देऊ नका आणि ज्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे त्या रस्त्यावरील खड्डे आधी बुजवा.
- समाधान चव्हाण, मालेगाव (१७ मालेगाव २)
170721\17nsk_17_17072021_13.jpg
१७ मालेगाव२