कळवण शहरातील मुख्य रस्त्यांचे भाग्य उजळणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:45+5:302021-08-19T04:17:45+5:30

कळवण तालुक्यात स्व ए. टी. पवार यांच्या नेतृत्वकाळात दळणवळणाच्या बाबतीत चांगली प्रगती झाली. दुर्गम व अतिदुर्गम भागात घाट कटिंगची ...

When will the fortunes of the main roads in Kalvan city brighten? | कळवण शहरातील मुख्य रस्त्यांचे भाग्य उजळणार कधी ?

कळवण शहरातील मुख्य रस्त्यांचे भाग्य उजळणार कधी ?

googlenewsNext

कळवण तालुक्यात स्व ए. टी. पवार यांच्या नेतृत्वकाळात दळणवळणाच्या बाबतीत चांगली प्रगती झाली. दुर्गम व अतिदुर्गम भागात घाट कटिंगची कामे झाल्याने गावे एकमेकांना जोडली गेली. गाव तेथे रस्ते, वाडी तेथे रस्ते, वस्ती तेथे रस्ते हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद या विभागांच्या माध्यमातून राबविल्याने संपूर्ण तालुका रस्त्यांनी जोडला गेला. आदिवासी व डोंगराळ भागातील गावांना जोडणारे पक्के रस्ते, नदी- नाल्यावरील पूल, फरशी पूल, घाट कटिंग आदी कामांमुळे जनतेच्या वेळात बचत झाली. तालुकाअंतर्गत संपर्क चांगल्या प्रकारे होत असल्याने गावे गावांना जोडल्याचे अभूतपूर्व काम झाले. तालुक्यात राज्यमार्ग १२५ कि मी लांबीचा असून, प्रमुख जिल्हामार्गाची लांबी ८० किमी आहे. या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करण्याची वेळ आज जनतेवर येऊन ठेपली आहे.

दरम्यानच्या काळात तालुक्यात सत्तांतर झाले. सन २०१४ ते २०१९ दरम्यान काळात तालुक्यात काही रस्त्यांची कामे झाली, मात्र त्यांचे कवित्व आता सुरू झाले. अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली.

इन्फो

कळवणच्या मेनरोडला वाली कोण?

गेल्या सहा /सात वर्षांपासून या ना त्या कारणाने दुर्लक्षित आणि अनेक कारणांनी दुखणं ठरलेल्या शहरातील मेनरोड रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करून मजबूत करण्याचे काम गेल्या १४-१५ महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून एकेरी वाहतूक आहे. शहरातील सर्वाधिक रहदारीचा एकमेव रस्ता म्हणून मेनरोड ओळखला जातो. शहरात येणारी व जाणारी वाहने याच रस्त्यावरून जात असल्याने सर्वांच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे.त्यामुळे सध्या या रस्त्यावरून वाहन चालवणारी शहरातील भोळीभाबडी जनता रस्त्याच्या कामामुळे वैतागून गेली आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेले खोदकाम, रस्त्यावर पसरलेली माती आणि पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर साचलेला चिखल, खड्ड्यांचे डबक्यात झालेले रूपांतर यामुळे कळवणच्या मेनरोडची प्रचंड दुर्दशा झाली आहे. संपूर्ण रस्ता चिखलात गेल्याने मेनरोडला वाली कोण, असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

इन्फो

ग्रामीण व आदिवासी भागातील रस्ते

कोल्हापूर फाटा ते अभोणा-चणकापूर रस्त्याचे २ कोटी रुपयांचे काम निविदा प्रक्रियेत अडकले असून, चणकापूर ते खिराड रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे त्याची सुधारणा करणे गरजेचे आहे. अभोणा गावाजवळील २ कोटींच्या पुलाच्या कामाचा श्री गणेशा झाला नसून चणकापूर ते देवळीवणी रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. देवळीवणी येथील पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. वरवंडी (कळवण तालुका हद्द ) ते निवाणे- कळवण रस्त्यावर वाहतूक वर्दळ जास्त असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरणासह मजबुतीकरण गरजेचे आहे. मळगाव - गायधरपाडा -धूमदर रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचे प्रयोजन आहे.

फोटो- १८ कळवण खबरबात

Web Title: When will the fortunes of the main roads in Kalvan city brighten?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.