कोठे खूप उत्सुकता, चर्चा, धावपळ
By admin | Published: October 15, 2014 12:32 AM2014-10-15T00:32:46+5:302014-10-15T00:33:20+5:30
कोठे खूप उत्सुकता, चर्चा, धावपळ
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान उद्या (दि़ १५) सर्वत्र होत आहे़ हातघाईच्या या परिस्थितीत मतदानाच्या अगोदरचा दिवस बहुतेक पक्ष कार्यालयांमध्ये संमिश्र होता़ कोठे खूप उत्सुकता, चर्चा, धावपळ व गडबड, तर दुसरीकडे नीरव शांतता अशी परिस्थिती दिवसभर पक्ष कार्यालयांची होती़ जिल्ह्यात सर्वच मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती होत आहेत़ त्यामुळे लढतींचे स्वरूप पक्ष न राहता उमेदवारनिहाय झाले आहे, याची झलकच आज शहर कार्यालयांमधून पाहावयास मिळत होती़ काही कार्यालयांमध्ये दिवसभर बूथप्रमुख व पोलिंग एजंटच्या नेमणुकांचे नियोजन सुरू होते़ प्रत्येक मतदान बूथवर बूथनिहाय याद्या, मतदार स्लिपा पोहच करण्याचे नियोजन सुरू होते़ काही ठिकाणी दिवसभर पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची वर्दळ, धावपळ सुरू होती. काही कार्यालयात भोजनाच्या पंगती उठत होत्या़ काही ठिकाणी बैठका व पदाधिकाऱ्यांचे गुफ्तगू चालू होते, तर काही ठिकाणी शांतता असल्याचे आज दिवसभर चित्र होते़ राष्ट्रवादी कॉँगे्रस पक्ष कार्यालय ४राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयात दिवसभर एकही पदाधिकारी फिरकला नाही़ बूथप्रमुख तसेच पोलिंग एजंटच्या नेमणुका सोमवारीच करण्यात आल्या असून, याद्याही बूथप्रमाणे त्या त्या उमेदवाराच्या कार्यालयात पोहच करण्यात आल्या असल्याने आज पदाधिकारी कार्यालयाकडे फि रकले नसल्याचे यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले़ मनसे कार्यालय ४नवीन सीबीएस येथील मनसे कार्यालयात आज दिवसभर शांतता होती़ सर्व नियोजन उमेदवार स्वत:च करत होते, तर मतदार याद्या, मतदार स्लिपा, बूथप्रमुख व पोलिंग एजंटच्या नेमणुकाही परस्पर केल्या गेल्याने पक्ष कार्यालयात शुकशुकाट होता़