तोतयागीरी करणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:21+5:302021-09-02T04:31:21+5:30

वणी : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राजमुद्रा असलेले नोटपॅड व माजी आमदार अनिल कदम यांच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे ...

Who is the mastermind of the impostor? | तोतयागीरी करणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण?

तोतयागीरी करणाऱ्याचा मास्टरमाइंड कोण?

Next

वणी : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राजमुद्रा असलेले नोटपॅड व माजी आमदार अनिल कदम यांच्या बनावट ओळखपत्राच्या आधारे मंत्र्यांबरोबर संबध असल्याचे भासविणारा तोतया राहुल आहेर गजाआड झाला असला तरी या प्रकरणाचा मास्टरमांईड कोण? असा पश्न कायम आहे. त्यामुळे या पकरणाच्या तळाशी जाऊन सखोल चौकशी केल्यास अनेक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील राहुल आहेर हा युवक विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे राजमुद्रा असलेले नोटपॅड व माजी आमदार अनिल कदम यांचे बनावट ओळखपत्र बाळगल्याच्या प्रकरणात प्रकाशझोतात आला. प्रथमतः स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सुकृतदर्शनी दिसून येत असले तरी आहेर याने नरहरी झिरवाळ यांचे नोटपॅड आणले कोठून? अनिल कदम यांचे बनावट ओळखपत्र कुठे तयार केले, तसेच आमदारांच्या वाहनावर लावण्यात येत असलेला लोगो राहुलकडे कसा आला? याची उकल होणे गजरेचे आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला लोगो, बनावट ओळखपत्र व नोटपॅड मागचा मास्टरमाईंडचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.

ईन्फो

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवड त्रिफुलीवर दिनांक २९ ऑगस्ट रोजी राहुल आहेर याची इनोव्हा रात्री १ वाजेच्या सुमारास आहगर यांस पकडले होते. दरम्यान, राहुल आहेर काही कालावधीपासून रामेश्वरनगर, गंगापूर, नाशिक येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. पत्नी व दोन मुले असून त्याच्या वडिलांचा शेती व्यवसाय आहे. छानछोकी व उंची लाईफस्टाईल तसेच समोरील व्यतीवर छाप पाडून प्रशासकीय कामे करून देण्याचे आश्वासन देण्यात पटाईत राहुल आहेर याचे कारनामे तपासात उघड होण्याची शक्यता आहे.

Web Title: Who is the mastermind of the impostor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.