पॅसेंजर रेल्वे अद्यापही का ठेवल्या लॉक ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:19 AM2021-08-19T04:19:45+5:302021-08-19T04:19:45+5:30
पंचवटी, राजधानी, तपोवन, जनशताब्दी, सेवाग्राम, मंगला, राजधानी, मुंबई पटना, काशी, पवन, कामयानी, जनता मेल, हावडा एक्स्प्रेस, देवगिरी, मुंबई वाराणसी, ...
पंचवटी, राजधानी, तपोवन, जनशताब्दी, सेवाग्राम, मंगला, राजधानी, मुंबई पटना, काशी, पवन, कामयानी, जनता मेल, हावडा एक्स्प्रेस, देवगिरी, मुंबई वाराणसी, महानगरी, पुष्पक अशा एकूण नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे अप व डाऊन मिळून ८0 रेल्वे धावत आहेत.
बंद असलेली एक्स्प्रेस
मनमाड-मुंबई धावणारी गोदावरी एक्स्प्रेस व एलटीटी हावडा दुरांतो एक्स्प्रेस या दोन नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या बंद आहेत. मुंबई व ठाण्याला दररोज नोकरी-व्यवसाय शिक्षण आदी कामासाठी जाणाऱ्या नाशिककरांना गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेसवर प्रवाशांचा भार वाढला आहे.
प्रतिक्रिया
रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट व पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्या गाड्या भविष्यात कधी सुरू होणार त्याबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठांकडून कुठल्याही प्रकारची माहिती व सूचना आलेली नाही. रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी लागू होत असल्याने व निर्णयाची अंमलबजावणी वरिष्ठांकडून संगणक प्रणालीमध्ये केली जात असल्याने आम्ही रेल्वे स्थानकावर फक्त वरिष्ठांच्या निर्णयाची अंमलबजावणी करतो.
आर. के. कुठार
प्रबंधक, नाशिकरोड रेल्वे स्थानक