पंचवटी, राजधानी, तपोवन, जनशताब्दी, सेवाग्राम, मंगला, राजधानी, मुंबई पटना, काशी, पवन, कामयानी, जनता मेल, हावडा एक्स्प्रेस, देवगिरी, मुंबई वाराणसी, महानगरी, पुष्पक अशा एकूण नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे अप व डाऊन मिळून ८0 रेल्वे धावत आहेत.
बंद असलेली एक्स्प्रेस
मनमाड-मुंबई धावणारी गोदावरी एक्स्प्रेस व एलटीटी हावडा दुरांतो एक्स्प्रेस या दोन नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या बंद आहेत. मुंबई व ठाण्याला दररोज नोकरी-व्यवसाय शिक्षण आदी कामासाठी जाणाऱ्या नाशिककरांना गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेसवर प्रवाशांचा भार वाढला आहे.
प्रतिक्रिया
रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट व पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्या गाड्या भविष्यात कधी सुरू होणार त्याबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठांकडून कुठल्याही प्रकारची माहिती व सूचना आलेली नाही. रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी लागू होत असल्याने व निर्णयाची अंमलबजावणी वरिष्ठांकडून संगणक प्रणालीमध्ये केली जात असल्याने आम्ही रेल्वे स्थानकावर फक्त वरिष्ठांच्या निर्णयाची अंमलबजावणी करतो.
आर. के. कुठार
प्रबंधक, नाशिकरोड रेल्वे स्थानक