आयुुक्तांचे ऐकता, मग नगरसेवकांचे का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:17 AM2018-10-24T00:17:39+5:302018-10-24T00:18:15+5:30
काही दिवसांपूर्वी तपोवनात वॉकविथ कमिशनर कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस साफसफाईचा घाट घातला, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयुक्त येणार म्हणून दखल घेतली जाते, मग आयुक्त मुंढे काय आभाळातून पडले का? असा सवाल करीत संतप्त लोकप्रतिनिधींनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
पंचवटी : काही दिवसांपूर्वी तपोवनात वॉकविथ कमिशनर कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस साफसफाईचा घाट घातला, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयुक्त येणार म्हणून दखल घेतली जाते, मग आयुक्त मुंढे काय आभाळातून पडले का? असा सवाल करीत संतप्त लोकप्रतिनिधींनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पंचवटी प्रभागाची बैठक सोमवारी (दि. २३) सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
प्रारंभीच नगरसेवक जगदीश पाटील यांनी उपअभियंत्याकडे विभागीय अधिकाºयांचा कारभार दिल्याने कामाचे नियोजन नाही अशी तक्रार केली. कमलेश बोडके यांनी मुंढे यांच्या कालावधीत स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगून साथीचे आजार वाढल्याने पेस्ट कंट्रोलचा ठेका रद्द करण्याचा ठराव करावा असे सांगितले. वाल्मीकनगरला घंटागाडी येत नाही परिणामी कचरा पाण्यात टाकावा लागतो, पथदीप बंद आहे अशी तक्रार सरिता सोनवणे यांनी केली. मोकाट श्वान पकडण्यासाठी संबंधित विभागाकडे तक्रार करूनही उपयोग नाही आम्हाला सांगा आम्ही कुत्रे पकडतो असे पूनम सोनवणे, सुरेश खेताडे यांनी सुनावले. आयुक्त तुकाराम मुंढे हे वॉकविथ कमिशनर कार्यक्रमासाठी येणार असल्याने मनपाकडून सलग चार दिवस स्वच्छता मोहीम राबविली गेली, आम्ही वारंवार तक्रार करतो त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात मग आयुक्त म्हणजे राजा का? असा सवाल मच्छिंद्र सानप यांनी केला. यावेळी चर्चेत भिकुबाई बागुल, वसंत ढुमसे, संजय दराडे, आर. एस. पाटील, सचिन जाधव आदींनी सहभाग घेतला. मनपाच्या अधिकाºयांना टेंडर बनविताना कोणता ठेकेदार त्यात कसा बसेल हे माहीत आहे, मग समस्या कशा सोडविता येतील याचा अंदाज नाही. अधिकारी हे लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, असा आरोप नगरसेवक जगदीश पाटील यांनी केला.