नाशिक : पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा हिरामण पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील अॅड़ पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे़ सुनेच्या त्रासामुळेच सासूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करून प्रवीण गांगुर्डे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आईचा मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती़ दरम्यान, या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनीही पैसे मागितल्याने त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे़दिंडोरीरोडवरील पोकार कॉलनीतील गणेश अपार्टमेंटमधील प्रवीण गांगुर्डे यांचा चार वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील राणी उर्फ स्वाती भीमराव पगारेसोबत झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने त्यांनी काही महिन्यांनी न्यायालयातून घटस्फोट घेतला़ यादरम्यान, सून राणी हिने पतीसह सासरच्यांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळाची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पती प्रवीण गांगुर्डे याच्यासह त्याच्या भावावर व आईवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात म्हसरूळ पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान, अनेक महिन्यांपासून पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या वाºया कराव्या लागल्याने गांगुर्डे कुटुंबीय जेरीस आले होते.११ सप्टेंबर रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गांगुर्डे कुटुंबाला न्यायालयाने जामीन मंजूर केला; मात्र राणी हिने संशयित गांगुर्डे यांना जामीन मंजूर झाल्याबाबत न्यायालयात अपील दाखल केले. त्यामुळे गांगुर्डे कुटुंबीयांना पुन्हा न्यायालयात यावे लागले. यातच शुक्रवारी (दि़१४) राणी, तिची आई, भाऊ व वकिलाने पती प्रवीण गांगुर्डे व सासूकडे गुन्हा मागे घ्यायचा असेल तर चाळीस लाख रुपयांची मागणी केली़ तसेच पैसे न दिल्यास तुम्हा सगळ्यांना बसवून ठेवते, तुमच्या पूर्ण खानदानाची वाट लावते, असा दम दिला़ या छळामुळे सासू लीलाबाई खचल्या होत्या. त्यांना शुक्रवारी (दि. १४) रात्री हृदयविकाराचा झटका आला व मृत्यू झाला़ याप्रकरणी प्रवीण गांगुर्डे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, खंडणीसह शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनिरीक्षकाची चौकशीम्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल गांगुर्डे यांच्यावरील गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी आरोपींना मदत करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा आरोपी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे़ विशेष म्हणजे मुंबई नाका पोलीस ठाण्यात असतानाही हिरे यांची कारकिर्द वादग्रस्त राहिलेली आहे़ या प्रकरणातील हिरे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी दिली आहे़
पतीसह सासूकडे पत्नीची चाळीस लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:41 AM