स्थानिक वाहनांसाठी करणार स्वतंत्र लेनची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:04+5:302021-02-26T04:19:04+5:30
सिन्नर - नाशिक मार्गावरील शिंदे टोल नाक्यावर व्यवस्थापकांची भेट घेऊन स्थानिक वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी सिमंतीनी कोकाटे यांनी त्यांच्या निदर्शनास ...
सिन्नर - नाशिक मार्गावरील शिंदे टोल नाक्यावर व्यवस्थापकांची भेट घेऊन स्थानिक वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी सिमंतीनी कोकाटे यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. स्थानिक वाहनचालकांना टोलनाक्यावर सवलत दिली असली तरी फास्ट टॅग सुविधा सुरू झाल्यानंतर स्थानिक वाहनचालकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक लोकांच्या आरसी बुकच्या अडचणी, स्थानिक वाहनांना फास्टटॅगमुळे न मिळणारी सवलत, टोलवर होणारी गर्दी अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. चर्चेनंतर स्थानिक वाहन चालकांनी आपले आरसी बुक व आधार कार्ड टोल नाक्यावर स्कॅन करुन घ्यावे, त्यांना पूर्वी प्रमाणेच सवलत देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी व्यवस्थापक यांनी दिले.
इन्फो
...तर आधार कार्ड पुरावा
ज्या स्थानिक वाहनांच्या आरसी बुकची अडचण असेल त्यांनी आधार कार्डचा पुरावा दाखवून कॅश लेनचा वापर करावा, असा पर्याय यावेळी टोल व्यवस्थापकांनी सुचवला. याप्रसंगी सिन्नरचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, सुदाम बोडके, संदीप शेळके, नितीन लोहकरे, कैलास झाडे, बाळकृष्ण केकान, मदन उगले आदींसह स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक उपस्थित होते.
फोटो - २५ शिंदे टोल
शिंदे टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना सवलत मिळावी, यासाठी टोल व्यवस्थापकांशी चर्चा करताना जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे.
===Photopath===
250221\25nsk_25_25022021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ शिंदे टोल शिंदे टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना सवलत मिळावी, यासाठी टोल व्यवस्थापकांशी चर्चा करताना जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे.