शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
3
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
4
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
5
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
6
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
7
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
8
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
9
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
10
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
11
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
12
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
13
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
15
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
16
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
17
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
20
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."

पंधरा वर्षांनंतर संपुष्टात येणार ‘महिलाराज’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 8:34 PM

शैलेश कर्पे सिन्नर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदशनील समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्याच ताब्यात आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, यावेळी सरपंचपद ह्यसर्वसाधारणह्ण होण्याची शक्यता असल्याने १५ वर्षांनंतर या खुर्चीवर पुरुषाला बसण्याचा योग येणार आहे.

ठळक मुद्देवडांगळी : सरपंचपद सर्वसाधारण होण्याची शक्यता , नाव निश्चितीसाठी पॅनलप्रमुखांची लागणार कसोटी

जावयाची धिंड व सतीमाता-सामंतदादा यामुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या वडांगळी ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक यंदा चांगलीच गाजली. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक व शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने ग्रामविकास पॅनलची निर्मिती केली होती. सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे यांचे पती व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक खुळे व पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे यांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. त्यात सुदेश खुळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने बाजी मारत सर्वच्या सर्व ९ जागांवर विजय मिळविला. यापूर्वी ग्रामविकास पॅनलच्या २ जागा बिनविरोध निवडून आल्याने ग्रामविकास पॅनलची निर्विवाद सत्ता आली आहे.ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलची निर्विवाद सत्ता आल्याने सरपंचपदासाठी विरोधी गटाकडून कोणतीही रस्सीखेच नाही. १५ वर्षे सरपंचपदाचे आरक्षण महिलांसाठी राहिल्याने यावेळेचे आरक्षण सर्वसाधारण असणार अशी शक्यता आहे. त्यामुळे सरपंचपदाची खुर्ची कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सुदेश खुळे, माजी सरपंच शिवाजी खुुळे, पांडुरंग खुळे, गणेश कडवे या ग्रामविकास पॅनलच्या नेत्यांची सरपंचपदाचे नाव निश्चित करताना कसोटी लागणार आहे.गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा विचार केल्यावर पुरुषाला पंधरा वर्षांत सरपंचपदाची खुर्ची मिळाली नाही. २००५-१० या सालासाठी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. अनुसूचित जातीचा पुरुष या निवडणुकीत विजयी झाला नसल्याने मंदा अढांगळे या महिलेला पाच वर्षे सरपंचपद भूषविण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर, २०१०-१५ या काळात सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी जाहीर झाले होते. या पाच वर्षांच्या काळात छाया पवार यांना पाच वर्षे सरपंचपदाचा मान मिळाला होता. त्यानंतर, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे २०१५-२० या सालासाठी सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग(ओबीसी)च्या महिलेसाठी निघाले होते. या काळात सुनिता सैंद व सुवर्णा कांदळकर या दोघा महिलांना अडीच-अडीच वर्षे सरपंचपदाची खुर्ची मिळाली होती. त्यामुळे २००५ पासून पुरुषांना सरपंचपदाने हुलकावणी दिली आहे. १५ वर्षे सरपंचपदाचा महिलाराज लोटल्यानंतर, यावेळी सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघेल, असा अंदाज आहे किंवा नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण निघू शकते. मात्र, गेल्या वेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला सरपंच होऊन गेल्याने सरपंचपद सर्वसाधारण होण्याची दाट शक्यता आहे.१५ वर्षांत चार महिला सरपंचवडांगळी ग्रामपंचायतीत २००५ पासून महिला सरपंच आहे. १५ वर्षांत मंदा अढांगळे व छाया पवार यांना प्रत्येकी पाच वर्षे गावचा कारभार करण्याची संधी मिळाली. त्यानंतर, सुनिता सैंद व सुवर्णा कांदळकर या महिलांनी प्रत्येकी अडीच वर्षे गावगाडा सांभाळला. १५ वर्षांत चार महिलांना सरपंचपद मिळाले. यावेळी महिला सरपंचपद जाऊन पुरुषांना संधी मिळणार असल्याने, सरपंचपदाचे महिलाराज संपुष्टात येण्याची आहे.सरपंचपदासाठी यांची चर्चासरपंचपद सर्वसाधारण होण्याची शक्यता असल्याने व १५ वर्षांत पुरुषांना संधी न मिळाल्याने, यावेळी पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. वडांगळी ग्रामपंचायतीत ११ जागा आहेत. त्यापैकी ६ महिला तर ५ पुरुष आहेत. या पाच पुरुषांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा पुरुष आहे. त्यामुळे उर्वरित तीन सदस्यांमध्ये सरपंचपदाची खुुर्ची मिळण्याची शक्यता आहे. माजी उपसरपंच व गेल्या पाच वर्षांचा ग्रामपंचायत कामाचा अनुभव असलेले नानासाहेब खुळे सरपंचपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्याचबरोबरच, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे यांना पराभूत करून जायंट किलर झालेले योगेश घोटेकर हेही सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत, तर ओबीसी जागेवर विजयी झालेले राहुल खुळे यांनाही सरपंचपदाची संधी मिळू शकते. सध्या तरी ग्रामविकास पॅनलकडून या तीन तरुणांची सरपंचपदाच्या नावासाठी चर्चा आहे. सरपंच आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी असून, त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत