ओझरचे आशिष शिंदे या टोमॅटो उत्पादक युवा शेतकऱ्याच्या फेसबुक लाईव्ह तक्रारीनंतर बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी व आडतदार-व्यापारी प्रतिनिधींच्या समन्वय बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसभापती दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, शंकरशेठ ठक्कर, नारायण पोटे, सचिव बाळासाहेब बाजारे आदी उपस्थित होते.
निफाडसह इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या लूटमारीच्या व्यथा आमदार दिलीप बनकर यांच्यासमोर मांडल्या. सभापती आमदार बनकर यांनीही मी सदैव शेतकऱ्यांसोबत असून यापुढे व्यापाऱ्यांच्या तक्रारी आल्यास थेट परवाने रद्द करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. गोदाकाठच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत यापुढे शेतकऱ्यांची लूटमार सुरूच राहिल्यास शिवसेना स्टाईलने व्यापाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा यावेळी दिला. पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, युवासेनेचे आशिष शिंदे, देवेंद्र काजळे, प्रकाश वाटपाडे, योगेश कुयटे, प्रवीण जगताप, भाऊ घुमरे यांनीही शेतकऱ्यांच्या तीव्र भावना यावेळी मांडत कारवाईची मागणी केली. व्यापाऱ्यांच्यावतीने सोहनलाल भंडारी यांनी भूमिका मांडली. आडत प्रतिनिधी सुभाषनाना होळकर, सुरेश खोडे, सोमनाथ निमसे, नंदू गांगुर्डे, अरुण चव्हानके यांनीही चर्चेत भाग घेतला. यावेळी बैठकीस विजय गवळी, शैलेंद्र वाळुंज, बाळासाहेब वाघ, संदीप तिडके, गंगाराम चौधरी, भाऊ घुमरे, योगेश कुयटे, रणजित वाघ, राहुल वाघ, दौलत वाघ, माधव बनकर, कुमार जाधव, संदिप साबळे, दादा महाले, संजय पवार, राहुल हरीश बोरस्ते, प्रमोद बोरस्ते, शेखर जाधव, योगेश तक्ते, शरद जाधव-वडनेर, संजय पवार राहुड आदीसह टोमॅटो उत्पादक मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.