शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:16 PM2020-05-25T21:16:19+5:302020-05-26T00:08:33+5:30
वैतरणानगर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहेत. शेतकर्यांचा नियमित वावर असणारे इगतपुरी येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख हे प्रमुख कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत देण्यात येणार्या विविध सुविधांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

कोरोना रोखण्यासाठी सर्व सुविधांमध्ये जनसंपर्क टाळण्यासाठी प्रभावी नियोजन केले असल्याची माहिती उपअधीक्षक दत्तात्रय वाघ, मुख्यालय सहाय्यक मिलिंद जगताप यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी सुविधांचा लाभ घेताना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरी येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयात शेतकर्यांसह नागरिकांचे महत्त्वपूर्ण काम नेहमीच असते. त्यामुळे या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढून जनसंपर्क होतो. जागेअभावी सामाजिक अंतर पालन करण्यास अडथळा येतो. या पाशर््वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक तत्वप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार मोजणी अर्ज देणे, नकला देणे घेणे, सिटी सर्व्हे उतारे, मालकी हक्काची नांवे लावणे, मिळकतीचे उतारे घेणे, माहिती मिळविण्यासह विविध अर्जाचे टपाल देणे आदी कामांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी चार खिडक्यांमध्ये कामकाज सुरू केले आहे. ह्या खिडक्यांमधून प्रशासकीय सुलभता व व सामाजिक अंतराचे पालन होत असल्याचे दिसत आहे. खिडकी क्र मांक 1 वर मोजणी अर्ज, शासकीय रक्कमा चलने, खिडकी क्र मांक 2 वर टपाल, खिडकी क्र मांक 3 वर नकला विभाग तर खिडकी क्र मांक 4 वर सिटी सर्व्हे उतारे व अन्य सेवा उपलब्ध केल्या आहेत. शेतकरी व अर्जदारांनी समक्ष संपर्क कमी करणेसाठी स्वत:चा व्हाटसअॅप क्र मांक, ई-मेल क्र मांक अर्जावर नमूद केल्यास अर्जाबाबत पुढील माहितीची सूचना दिली जाणार आहे.