बदलत्या वातावरणामुळे सर्दी-तापाची साथ

By admin | Published: January 15, 2015 12:20 AM2015-01-15T00:20:16+5:302015-01-15T00:20:31+5:30

तपमानात चढउतार : दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ; मनपा दवाखान्यांची ओपीडी फुल्ल

Winter vapor with changing environment | बदलत्या वातावरणामुळे सर्दी-तापाची साथ

बदलत्या वातावरणामुळे सर्दी-तापाची साथ

Next

नाशिक : हेमंत आणि शिशिर ऋतूंचा संधिकाळ, गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानात होत असलेला चढउतार आणि कडक उन्हात वाढलेला गारवा अशा बदलत्या वातावरणामुळे शहरात सर्दी-खोकला आणि तापाची साथ पसरली असून, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या सप्ताहात महापालिकेच्या रुग्णालयांमधील ओपीडींमध्ये तापाचे सुमारे ९५७, तर सर्दी-खोकल्याचे १२२ रुग्ण दाखल झाले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानात चढउतार होत असून, दुपारी कडक ऊन पडलेले असतानाच हवेतील गारवाही अंगाला झोंबत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत तपमान ५.८ ते ५.६ अंश सेल्सियस यादरम्यान नोंदविले गेले.
मध्येच ढगाळ वातावरणही निर्माण होत आहे. या बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य आजारांची लागण नागरिकांना होत असून, सर्दी-पडसे, ताप, खोकला यांची साथ पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयांमधील ओपीडींमध्ये ताप व सर्दीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल होताना दिसून येत आहेत, तर खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.
बदलत्या हवामानामुळे अंगदुखी, संधिवात, घसा खवखवणे,
त्वचा कोरडी पडणे, दम्याचा
त्रास आदि आजारांचाही सामना नागरिकांना करावा लागतो आहे.
सर्दी-खोकल्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये कफसिरफला
मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. याशिवाय लोक घरगुती उपचारांवरही भर देताना दिसून येत आहेत. तापामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये क्रोसिनसारख्या गोळ्यांचाही खप वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Winter vapor with changing environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.