नाशिक : तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतरही समाज कल्याण विभागाकडून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती महाविद्यालयांना प्राप्त झालेली नाही. संबंधित महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखले असून, उत्तीर्ण होऊनही प्रवेशप्रक्रियेत टीसीअभावी अडसर निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दहावीनंतर तीन वर्ष डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता असते. परंतु डिप्लोमा उत्तीर्ण होऊनही केवळ शासनाने महाविद्यालयाने शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग केली नसल्याने महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क थकीत असल्याचे दाखवत विद्यार्थ्यांचे दाखले रोखले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या मार्गात अडसर निर्माण झाल्याने पालकांकडून अडचणीच्या काळात पैशाची जमावाजमव करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्ण करून द्यावे लागत आहे. परंतु ज्या पालकांची आर्थिक क्षमताच नाही अशा विद्यार्थ्यांचे दाखले महाविद्यालयांनी रोखल्याने त्यांना पदवी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याने उत्तीर्ण होऊनही प्रवेश न मिळाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शासनाकडून दिली जाणारी शिष्यवृत्तीची रक्कम मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत महाविद्यालयांना वर्ग होणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी परीक्षा संपल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही महाविद्यालयांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. ही शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांकडे थकीत असल्याचे दाखवत महाविद्यालयांनी प्रमाणपत्रांसाठी अडवणूक सुरू केली आहे.महाविद्यालयांकडून अडवणूकसमाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती वितरण प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना वर्ग होऊ शकलेली नाही. परंतु अशा तांत्रिक अडचणींच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अशा सूचना समाज कल्याण विभागाकडून वेळोवेळी महाविद्यालयांना परिपत्रकाच्या माध्यमातून दिल्या जातात. मात्र तरीही अशाप्रकारे विद्यार्थ्यांची अडवणूक सुरू असल्याने डिप्लोमानंतर अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाचे प्रवेश संकटात आले असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याने शैक्षणिक शुल्काचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:30 AM
तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतरही समाज कल्याण विभागाकडून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती महाविद्यालयांना प्राप्त झालेली नाही. संबंधित महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखले असून, उत्तीर्ण होऊनही प्रवेशप्रक्रियेत टीसीअभावी अडसर निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देप्रमाणपत्र रोखले : रोख रक्कम भरण्याचा सल्ला