मानोरी येथे भिंत कोसळून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:05 PM2019-10-25T23:05:47+5:302019-10-25T23:06:39+5:30
देवगाव : परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मानोरी येथील राजेंद्र माधव लोहारकर यांच्या घराची भिंत कोसळून कलावती माधव लोहारकर (७५) यांचा मृत्यू झाला. यावेळी चौघांच्या अंगावर घराची मातीची भिंत कोसळली. यात अलका राजेंद्र लोहारकर (४९), शुभांगी अनिल लोहारकर (२२), काव्या अनिल लोहारकर (१६) या गंभीर जखमी झाल्या आहेत. भिंतीच्या ढिगाºयाखाली अडकलेल्या चौघांची नागरिकांनी तत्काळ सुटका करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
देवगाव : परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मानोरी येथील राजेंद्र माधव लोहारकर यांच्या घराची भिंत कोसळून कलावती माधव लोहारकर (७५) यांचा मृत्यू झाला.
यावेळी चौघांच्या अंगावर घराची मातीची भिंत कोसळली. यात अलका राजेंद्र लोहारकर (४९), शुभांगी अनिल लोहारकर (२२), काव्या अनिल लोहारकर (१६) या गंभीर जखमी झाल्या आहेत. भिंतीच्या ढिगाºयाखाली अडकलेल्या चौघांची नागरिकांनी तत्काळ सुटका करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. कलावती लोहारकर (७५) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना निफाड येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुलगा सून, नातवंडे असा परिवार आहे. सदर घटनेचा पंचनामा मंडल अधिकारी के. पी. केवारे, तलाठी दीपक किर्डे, पोलीसपाटील सुनील बोचरे, कोतवाल निवृत्ती तासकर यांनी केला.