भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:04 PM2020-09-26T22:04:30+5:302020-09-27T00:41:16+5:30
पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अशा वस्तीची जबाबदारी झटकून टाकली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आदिवासी महिलांवर जीवघेणी कसरत करत पाणी आणण्याची वेळ आली आहे.
पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अशा वस्तीची जबाबदारी झटकून टाकली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आदिवासी महिलांवर जीवघेणी कसरत करत पाणी आणण्याची वेळ आली आहे.
गावाच्या स्मशानभूमी जवळील व राणवड कारखान्यालगत डाव्या कालव्या जवळ असलेल्या दोन आदिवासी वस्त्या या वस्तीत पाणी, घरकुल, शौचालय, लाईट, रस्त्यांविना उपेक्षा आजही सुरु असल्याचे भयाण वास्तव पहावयास मिळत आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नांदुर्डी व उगाव खेड या दोन्ही गावाच्या मधोमध असलेली कारामाईनदी ओलांडून उगावखेड येथील शेतकरी निफाडे यांच्या विहिरीतून पाणी आणावे लागते पण नदीचा ओस वाढला तर पाण्यासाठी जीव पाण्यातच वाहून जाईल ही भीतीही न बाळगता या महिलांची नदीतून ही कसरत शासनाने वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे. सहाशे ते सातशे आदिवासी लोक वस्ती असलेल्या नांदर्डी गावातील सूर्यवंशी नगर व राघोजी भांगरे नगर अशा दोन आदिवासी वस्तीत चारशे ते पाचशे नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड , रेशन कार्ड देखील आहे मात्र परिसरात कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर येतात व निवडणूका झाल्यावर फिरकून पण पाहत नाही.परिणामी त्या वस्तीतील बांधवाना कुठल्याही सोयी व सुविधा नसल्याने आत्ता पर्यंत लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनाचीच खैरात वाटली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आदिवासी समाजाच्या बोटावर मोजता येतील एवढ्या गरजा आहे पण कोणत्याही नेत्याने किंवा शासनाने त्या सोडवण्याचा प्रत्यन केला नाही. वारंवार पत्रव्यवहार व हंडा मोर्चा करून देखील गेंड्याच्या कातढ्याच शासन दखल घेत नाही. नेते, पुढारी जेवढे जबाबदार आहे तेवढे सरकारी यंत्रणाही आहे. या उपेक्षित लोकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत.
- वंदना कुडमते, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा, आदिवासी शक्ती सेना
जोराचा पाऊस असल्याने नदीला पूर आला होता. त्यामुळे चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नव्हते. घराच्या बाहेर हंड्यात साचलेले पावसाचे पाणीच दोन दिवस प्यायला लागले. त्यामुळे काही जण आजारीही पडले पण नाईलाज होता आज पूर ओसरला तेव्हा नदीच्या पलीकडे असलेल्या उगाव खेडे या गावातून पाणी आणले.
- सरला कोकाटे, नांदुर्डी
फोटो :
नांदुर्डी गावातील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वाहत्या नदीतून सुरू असलेली भटकंती. (26पिंपळगाव1)